Parambir Singh | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 24 लाखांचे भाडे थकवले, कारवाईची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी लेटरबॉम्ब टाकून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी कोट्यावधी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते असा आरोप केला होता. या प्रकरणात परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह हे ठाणे आयुक्त (Thane Police Commissioner) असताना मलबार हिल (Malabar Hill) परिसरातील अपार्टमेंटमध्ये राहत होते. या अपार्टमेंटमध्ये राहत असताना त्यांनी त्याचं भाडे थकवल्याचा (not paid rent) आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परमबीर सिंह हे 18 मार्च 2015 मध्ये ठाणे पोलीस आयुक्तपदावर नियुक्त झाले. त्यापूर्वी ते मुंबईत स्पेशल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे अ‍ॅडिशनल डीजीपी (Additional DGP of Special Reserve Police Force Mumbai) होते. याच काळात ते मलबार हिल परिसरातील बीजी खेर मार्गावर असलेल्या निलम अपार्टमेंट (Nilam apartment) हे सरकारी निवासस्थान मध्ये वास्तव्यास होते. यानंतर त्यांची नियुक्ती ठाणे पोलीस आयुक्तपदी झाली. त्यांना ठाण्यात सरकारी निवासस्थान मिळाले. परंतु परमबीर सिंह यांनी मलबार हिल परिसरातील निलम अपार्टमेंटमधील घर खाली केले नाही.

54.10 लाख रुपये थकीत
एका इंग्रजी वृतपत्राच्या वृत्तानुसार, परमबीर सिंह यांची ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून 17 मार्च 2015 ते 29 जुलै 2018 पर्यंतचे घरभाडे आणि पेनल्टी जोडून सुमारे 54.10 लाख रुपये थकित आहे. एका रिपोर्टनुसार, 35 आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांवर जवळपास 4 कोटी रुपये घरभाडे आणि पेनल्टी (Rent and penalty) दिली नसल्याची माहिती आहे. नियमानुसार एकाचवेळी दोन सरकारी निवास्थान अधिकाऱ्यांना वापरता येत नाहीत.

 

तर भाडे आणि पॅनल्टी वसूल केली जाते

अधिकाऱ्यांना देण्यात आलेले निवासस्थान त्यांची पोस्टिंग समाप्त झाल्यानंतर 15 दिवसात ते राहत असलेले निवास्थान सोडण्याची मुदत मिळते.
या कालावधीत सरकारकडून केवळ लायसन्स फी आकारली जाते.
जर या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये अधिकाऱ्याने आपले निवासस्थान खाली केले नाही तर सरकार त्यांच्याकडून भाडे आणि पॅनल्टी दोन्ही वसूल करते.

परमबीर सिंग घरभाडे वसूल करणार
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,
कोणत्याही अधिकाऱ्याला दोन सरकारी निवासस्थानात राहता येत नाही.
आम्ही हे थकीत घरभाडे आणि पेनल्टी त्यांच्या पगारातून कापून घेऊ.
जर हे शक्य झाले नाही तर आम्ही 2022 मध्ये त्यांच्या निवृत्तीनंतर ही रक्कम वसुल करु.

Web Title :- Parambir Singh | param bir singh not paid several lakhs rs rent for official apartment may face action says report

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IRCTC News : आता ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंगपूर्वी करावे लागेल मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या

Pune Crime | कोंढवा पोलिसांकडून पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या भाजपच्या माजी नगरसेवक विवेक यादवला गुजरात बॉर्डरवरून अटक

Earthquake | बिकानेरमध्ये 24 तासात दुसर्‍यांदा भुकंपाचे झटके; पाकिस्तान होता केंद्रबिंदू, जीवितहानीचे अद्याप वृत्त नाही

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी