Parambir Singh | परमबीर सिंह यांचा खळबळजनक आरोप; म्हणाले – ‘सचिन वाझेवर तुरुंगात दररोज अत्याचार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Parambir Singh | मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांची सध्या सक्तवसुली संचालनालय (ED) आणि मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) चौकशी सुरू आहे. या आगोदरही परमबीर सिंह यांनी खळबळजनक खुलासे केले आहेत. दरम्यान आज (गुरूवारी) परमबीर सिंह यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात सचिन वाझे बाबत (Sachin Vaze) खळबळजनक खुलासा केला आहे. ‘सचिन वाझेवर तुरुंगात अत्याचार होत असल्याचं,’ परमबीर सिंह यांनी सांगितलं आहे.

 

परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी ईडीच्या दोषारोपत्रात म्हटले आहे की, ‘सचिन वाझे यांच्यावर तुरुंगात दबाव टाकला जात असून त्यांचे कपडे काढले जात आहेत. तसेच त्यांच्यावर रोज अत्याचार होत असल्याचं देखील आपल्याला समजले आहे,’ असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे.

 

दरम्यान, परमबीर यांनी ईडीला एक निवेदन दिले आहे. यात एका डीसीपींनी वाझेची गुप्तभेट घेतल्याचा उल्लेख केला आहे.
डीसीपींनी चांदीवाल आयोगादरम्यान (Chandiwal Commission) सचिन वाझेची भेट घेतली होती.
तसेच ते वाझेवर दबाव टाकत होते, असं देखील परमबीर यांनी सांगितलं आहे.
तसेच,डीसीपींनी वाझेसह अनिल देशमुखांचीही (Anil Deshmukh) भेट घेतली.
तर, वाझेने ईडीला दिलेला जबाब मागे घेण्यासाठी डीसीपी दबाव टाकत असल्याचा आरोप परमबीर यांनी केला. तसेच, चांदीवाल आयोगाच्या सुनावणी दरम्यान देशमुख यांनी 30 नोव्हेंबर 2021 रोजी सचिन वाझेची भेट घेतली होती. असा खुलासा परमबीर यांनी केला आहे.

 

Web Title :- Parambir Singh | police torture sachin vaze in jail allegation by former mumbai cp parambir singh in anil deshmukh case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा