Parambir Singh | ‘परमबीर सिंह यांच्या निलंबनाची कारवाई सुरू’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Parambir Singh | मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींचे वसुलीचे आरोप केले. यामुळे राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर परमबीर सिंह गायब होते. परमबीर यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यावरुन त्यांना अनेक वेळा समन्स बजावून देखील ते गैरहजर राहिले. सध्या त्यांची मुंबईत चौकशी सुरू असतानाच आता त्यांच्यावर निलंबनाची (Suspended) प्रक्रियादेखील सुरू केल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली आहे.

 

परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्यावर त्यांच्या गैरवर्तवणूक आणि इतर अनियमिततेबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, त्याचबरोबर त्यांच्या निलंबनाची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आलीय, अशी माहिती गृहमंत्री वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज (मंगळवारी) दिली आहे. ‘परमबीर सिंह परतल्यानंतर त्यांनी कोणत्याही पदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे त्यांनी सरकारी वाहनांचा वापर करू नये. दरम्यान, परमबीर सिंह यांच्यात आणि सचिन वाझे यांच्यामध्ये सोमवारी झालेल्या भेटीची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं देखील गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

 

दरम्यान, बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) मनसुख हिरेन हत्येशी संबंधित असल्याने त्याची देखील चांदीवाल आयोगाकडून (Chandiwal Commission) चौकशी सुरूय.
सुरुवातीला दोघांत काही सेकंद बोलणं झाल्याचं सांगण्यात आलं.
परंतु, दोघेही तासभर सोबत असल्याची माहिती समोर आलीय.
यानंतर गृहमंत्री वळसे पाटील यांनी संबंधित प्रकरणावर नाराजी व्यक्त करत,
सचिन वाझे-परमबीर भेटीबद्दल मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

Web Title :- Parambir Singh | process for parmbir singh suspension is underway says maharashtra home minister dilip wales patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात महिलेच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Avoid Fake Fastag | ऑनलाईन विकला जातोय बनावट Fastag, सरकारने सांगितले बचावाची पद्धत

Omicron Variant | पुणेकरांची चिंता वाढली ! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तीमध्ये ‘कोरोना’ची लक्षणं, रिपोर्टची प्रतीक्षा