parambir singh supreme court | 30 वर्ष दलात राहून पोलिसांवरच अविश्वास दाखवता?, सर्वोच्च न्यायालयाचे परमबीर सिंग यांच्यावर ताशेरे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्या होमगार्डचे संचालक असलेले परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केलेली रिट याचिका (Petition) हि दाखल करून घेण्यास सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नकार दिला. परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी महाराष्ट्र सरकारने आपल्या विरोधात सुरू केलेल्या चौकशीला आव्हान देणारी याचिका दाखल करत होते. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) परमबीर यांची याचिका फेटाळून लावत तीस वर्ष पोलीस दलात राहून आता पोलिसांवरच अविश्वास का दाखवता? असा थेट सवाल केला आहे. तसेच, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांना दगड मारू नयेत, अशा शब्दात एक इशारा देत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) परमबीर यांना फाटकराले आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) हे महाराष्ट्र पोलीस केडरचा एक भाग आहेत.
महाराष्ट्रात पोलीस दलात त्यांनी 30 पेक्षा जादा वर्षे सेवेत कार्यरत आहेत.
मात्र, परमबीर यांना महाराष्ट्रातील यंत्रणेवर अजिबात विश्वास राहिलेला नाही.
याप्रकरणी परमबीर सिंग यांनी केलेले हे आरोप धक्कादायक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) म्हटलं आहे.
तसेच, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्या. व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने परमबीर सिंग (Parambir Singh) यांना ही रिट याचिका (Writ petition) मागे घेण्यास परवानगी दिली आहे.
दरम्यान, मुंबई हाय कोर्टात दाद मागण्याची सूचना देखील सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) परमबीर सिंग यांना केली आहे.

 

काय आहे प्रकरण?

मुबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते.
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवास्थानापासून नजीकच स्फोटके असलेली कार आढळून आली होती.
तसेच ठाण्याचे प्रसिद्ध व्यापारी मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचे मृत्यू प्रकरण (Death case) यामध्ये गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांचे नाव आरोपी म्हणून समोर आले.
या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंग यांचीही चौकशी सुरू केली.
त्यानंतर त्याविरोधात परमबीर सिंग यांची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी सुप्रीम कोर्टात मांडली.
दरम्यान, तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी म्हटले की, महाराष्ट्र सरकार आपला छळ करीत आहे.
आपण या सरकारला लिहिलेले पत्र मागे घेण्यास चौकशी अधिकाऱ्याने सांगितल्याचा दावा देखील सुप्रीम कोर्टात केला आहे.

Wab Title :- parambir singh supreme court | after 30 years force you show distrust police supreme court slaps param bir singh

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

COVID-19 in India : 70 दिवसानंतर कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात आली 84 हजार प्रकरणे; 4002 जणांचा मृत्यू

चुकूनही करू नका LIC चे ‘हे’ काम, अन्यथा विमा कंपनी करू शकते कठोर कायदेशीर कारवाई; जाणून घ्या

Adar Poonawalla Security | सुरक्षेची मागणी करताच सुरक्षा पुरवणार, राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा