Parambir Singh | अखेर परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा समजला ! SC कडून माजी पोलिस आयुक्तांना दिलासा; सीबीआय आणि ठाकरे सरकारला नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) हे मागील काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. परमबीर सिंह नेमके कुठे आहेत? अशी चर्चा सुरु आहे. अखेर आज या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. परमबीर सिंह (Parambir Singh) भारताबाहेर गेले नसून, ते देशातच (country) आहेत, अशी माहिती (Information) त्यांच्या वकिलांनी आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दिली. तसेच पुढच्या 48 तासात सीबीआयसमोर (CBI) हजर होण्यास तयार आहे असे देखील त्यांनी न्यायालयाला सांगितले. सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. अटकेपासून संरक्षण दिले आहे.
Former Mumbai Police Commissioner Singh tells Supreme Court that he is ready to appear before CBI within 48 hours. Supreme Court grants protection from arrest to him and directs him to join the investigation. pic.twitter.com/0fSbDWc3va
— ANI (@ANI) November 22, 2021
परमबीर सिंह यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, परमबीर यांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते समोर आलेले नाहीत. परमबीर सिंह (Parambir Singh) कुठे आहेत हे समजत नाही, तो पर्यंत खंडणी प्रकरणात (Ransom case) अटकेपासून संरक्षण दिले जाणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने मागच्या सुनावणीत स्पष्ट केलं होतं. परमबीर सिंह चंदीगड (Chandigarh) येथे असल्याची त्यानंतर ते बेल्जियमला (Belgium) निघून गेल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती.
Param Bir Singh (former Mumbai Police Commissioner) is very much in the country and he is not absconding – his advocate tells the Supreme Court. pic.twitter.com/imxjQ0qxna
— ANI (@ANI) November 22, 2021
–
परमबीर सिंह देशात किंवा अन्य कुठे आहेत,
ते समजल्यानंतर याचिकेवर सुनावणी घेतली जाईल असे 18 नोव्हेंबरला न्यायाधीश संजय किशन कौल (Judge Sanjay Kishan Kaul) यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने (bench) स्पष्ट केलं होतं.
आमच्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत, तोपर्यंत कोणतीही सुनावणी होणार नाही, संरक्षण मिळणार नाही,
असे खंडपीठाने परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या वकिलांना सांगितले होते.
Param Bir Singh's advocate tells the Supreme Court that Singh is hiding as he faces threat to his life from Mumbai Police.
— ANI (@ANI) November 22, 2021
बिमल अग्रवाल (Bimal Agarwal) यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
दोन हॉटेल्सविरोधात कारवाई करण्याची धमकी देऊन आपल्याकडून 11.92 लाख रुपये उकळले,
असा आरोप केला होता. दरम्यान, न्यायालयानं ठाकरे सरकार (Thackeray Government) आणि CBI ला नोटिस देखील बजावली आहे.
आता याबाबतची पुढील सुनावणी 6 डिसेंबरला होणार आहे.
Web Title :- Parambir Singh | supreme court grants param bir singh protection arrest ask him join probe notice to cbi and thackeray government also
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update