Parambir Singh | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह ‘फेसटाइम’ आयडीवरुन आरोपींच्या संपर्कात?
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानी स्फोटकांनी भरुन आढळुन आलेली कार आणि ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren murder) प्रकरणावरुन राज्यभर खळबळ माजली. तेव्हापासुन अनेक काही नवनवे गुढ समोर येताना दिसत आहे. दरम्यान या दोन्ही प्रकरणाच्या कटाशी मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांचा संबंध असल्याचा संशय अधिकच गडद होत असल्याचं समोर येत आहे. NIA ने थेट आरोपपत्रात परमबीर यांचे नाव घेतले नाही. परंतु त्यात विविध पुरावे जोडले असल्याने परमबीर (Parambir Singh) यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
अँटिलिया आणि मनसुख हिरेन (Antilia and Mansukh Hiren) या दोन्ही प्रकरणात परमबीर सिंह हे अटक आरोपींशी फेसटाइम आयडी (FaceTime ID) वापरून संपर्कात होते, असा आरोप केला जातोय.
त्या ‘फेसटाइम’ आयडीचे पहिले नाव कुरकुरे आणि आडनाव बालाजी होते.
तपासा वेळी, NIA ला गुगल खात्याबाबत माहिती मिळाली जी ‘फेसटाइम’ चालविण्यासाठी वापरली गेली होती.
त्याच ‘फेसटाइम’ आयडीचा वापर आरोपींशी संवाद साधण्यासाठी केला गेला होता.
तसेच, तपासात आरोपी Google खात्याचा वापर करून ‘फेसटाइम’ चालवित होते.
ISE####@gmail.com या खात्याशी कोणाचा फोन जोडलेला आहे आणि त्याचे नाव काय आहे हे शोधण्यासाठी Apple कंपनीच्या कायदेशीर कंपनीशी संपर्क साधला. परमबीर यांच्या निकटच्या 2 व्यकीच्या चौकशीतून बाबी समोर आल्याचे समजते.
नाव लक्षात राहण्याच्या हेतूने आयडीसाठी पहिले नाव ‘कुरकुरे’ आणि आडनाव ‘बालाजी’ ही नाव दिल्याचे अधिकारी सांगत असला, तरी आता त्याचे पासवर्ड माहित नसल्याचे त्या अधिकाऱ्याने जबाबात सांगितले.
दरम्यान, तपासादरम्यान NIA ला एक संशयित Email ID सापडला.
याच Email ID चा वापर आरोपी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करत असल्याचा संशय आहे, असा NIA ने 8 जुलै रोजी Apple इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला ईमेल पाठवाला.
त्यावर Apple ने 20 जुलै रोजी NIA ला दिलेल्या माहितीवरुन एनआयए ला धक्का बसला.
ज्या Email ID बद्दल बोलत आहेत. त्याचे पहिले नाव ‘कुरकुरे’ आणि आडनाव ‘बालाजी’ आहे.
हे वाचल्यानंतर NIA ला परमबीरच्या जवळच्या एक अधिकारी व्यक्ती खर सांगत असल्याची ओळख पटली. असं सांगितलं.
Permanent License Exam | पुण्यामध्ये पर्मनंट लायसन्सची परीक्षा रविवारीही होणार