Parambir Singh | परमबीर सिंह यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतली भूमिका; तडकाफडकी नाही होणार ‘ही’ कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) परदेशामध्ये निघून गेल्याची चर्चा आहे. परमबीर सिंह सध्या कुठे आहे याबाबत काहीच माहिती नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी गुरुवारी (दि.30 सप्टेंबर) सांगितले होते. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, परमबीर सिंह (Parambir Singh) यांना तडकाफडकी निलंबित (Suspend) करण्यात येणार नाही. परमबीर सिंह यांच्या निलंबनाबाबत राज्य सरकारने (state government) सावध भूमिका घेतली आहे.

राज्य सरकार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर निलंबनाची प्रक्रिया सुरु करणार आहे. परमबीर सिंह (Parambir Singh) प्रकरणी एकीकडे चांदीवाल आयोगाची (Chandiwal Commission) प्रक्रिया सुरु आहे. तर दुसरीकडे त्यांनी अर्ज केलेली रजा (sick leave) संपून 30 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट (Medical certificate) देखील सिंह यांनी दिलेले नाही. त्यामुळे परमबीर सिंह यांना मेडिकल बोर्डासमोर (medical board) हजर राहावे लागण्याची शक्यता आहे. एकूणच सर्व कायदेशीर बाबी तपासल्यानंतर राज्य सरकार त्यांच्यावर निलंबनाची करावाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

तपास यंत्रणांना संशय आहे की, परमबीर सिंह हे युरोपियन देशांत (European countries) गेले आहेत. यावर बोलताना वळसे पाटील म्हणाले, परमबीर सिंह हे एक सरकारी अधिकारी असून देशाबाहेर जायच्या आधी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. गृहमंत्रालयाच्या मदतीने आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. ते जर देशाबाहेर गेले असतील तर हे योग्य नाही. मंत्री किंवा अधिकारी कोणीही असेल तर त्यांना परवानगी घेतल्याशिवाय देशाबाहेर जात येत नाही. त्यांचं इथे असणं गरजेचं आहे, त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते, त्याचा हिशोब करायचा आहे. परंतु आम्ही कोणावरही जाणीवपूर्वक कुणाच्या मागे लागून करावाई करणार नाही, हा सगळा रुटीन कारवाईचा भाग असल्याचे वळसे पाटील म्हणाले.

 

Web Title : Parambir Singh | The role played by the state government regarding Parambir Singh; suspension will not be taken now

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Air India चे खासगकीकरण ! Tata लिलाव जिंकल्याच्या बातम्या, परंतु सरकारने नाकारले

Multibagger stock | 11.90 रुपयांच्या शेयरने गुंतवणुकदारांना केले मालामाल ! 1 लाखाचे झाले 80 लाख, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

Gold Silver Price Today | ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही सोन्या-चांदीचे दर उतरले; जाणून घ्या