Parambir Singh | परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; ठाण्यात तिसरा FIR दाखल, जाणून घ्या प्रकरण?

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाणे आणि मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त तथा गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यात (Thane Nagar Police Station) परमबीर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल (FIR) झाला आहे. मुंबईत एक आणि ठाण्यात दोन असे तीन गुन्हे आतापर्यंत दाखल झालेत. सिंग यांच्यासह अन्य काही अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. केतन तन्ना, सोनु जलान, आणि रियाज भाटी या तिघांनी तक्रार दाखल केली होती. यावरून त्या तिघांचा जबाब नोंदवून परमबीर (Parambir Singh) यांच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात (Thane Nagar Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

या तिघांनी केलेल्या तक्रारीमध्ये परमबीर यांच्यासह 28 जणांची नावे आहेत. त्यात 8 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देखील नावाचा समावेश आहे तसेच, कुख्यात गुंड रवी पुजारी यांच्या देखील नावाचा समावेश आहे. परमबीर यांच्यासह अन्य जणांवर जबरी चोरी, धमकावणे, खंडणी यांसारखे दहाहुन जास्त कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. माजी ठाणे खंडणी विरोधी पथक प्रमुख प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे, ACP एन टी कदम तर, 2 पोलीस कर्मचारी यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, परमबीर यांच्या विरोधात केतन तन्ना (Ketan Tanna), सोनु जलान (Sonu Jalan), आणि रियाज भाटी (Riaz Bhati) यांचा मागील तीन दिवसापासून संघर्ष सुरू होता.
आपल्याला न्याय मिळाला आहे आणि हा न्यायव्यवस्थेचा विजय असल्याचं सोनू जलान म्हणाला आहे.

मुंबईत एक तर ठाण्यात दोन गुन्हे –

मुंबईतील खंडणीच्या गुन्ह्यात नंतर परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्यावर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा होता. शरद अग्रवाल या व्यक्तीने ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या (Thane Police Commissionerate) परिमंडळ पाचमध्ये येणाऱ्या कोपरी पोलीस स्टेशनमध्ये (Kopari Police Station) परमबीर आणि पराग मनेरे यांच्यासह आणखी 3 जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
याचप्रमाणे ठाण्यात देखील विविध खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन परमबीर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यावर खंडणी (Ransom) घेतली असल्याचे तक्रारदार शरद अग्रवाल (Sharad Agarwal) यांनी तक्रारीत म्हटले होते.
दरम्यान,भाईंदर येथील बिल्डर श्याम सुंदर अग्रवाल यांनी मरीन ड्राईव्ह येथे परमबीर सिंग आणि
मुंबई पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांविरुद्ध 15 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा (FIR) नोंदवला आहे.
याचा तपास मुंबई SIT करणार आहे.

Web Title : Parambir Singh | third case has been registered against
parambir singh in thane police

Pimpri Crime | भर रस्त्यात रिक्षाचालकांकडून ‘वसुली’ करत होते तोतया पोलिस,
पुढं झालं असं काही…

Pimpri Crime | विनामास्क कारवाई करणार्‍या पोलिसाला दोघांकडून दांडक्याने मारहाण

Tokyo Olympics | टोकियोतून आशादायक बातमी !
थाळीफेकमध्ये कमलप्रीतने दाखविली कमाल; फायनलमध्ये केला प्रवेश

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ,
जाणून घ्या आजचे दर