Parambir Singh | परमबीर सिंह खंडणी प्रकरणातील 2 निलंबित पोलिस अधिकारी पुन्हा राज्य पोलिस दलाच्या सेवेत, जाणून घ्या प्रकरण

0
660
Parambir Singh | Two suspended police officer in mumbai ex cp parambir singh extortion case reinstated
FILE PHOTO

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबइचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) खंडणी प्रकरणात (Extortion Case) निलंबित (Suspended) असलेले पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे (Police Inspector Nandkumar Gopale) व आशा कोरके (Asha Korke) या दोन अधिकार्‍यांना पुन्हा सेवेत रूजू करण्यात आले आहे. प्रकरणात त्यांना अटक झाल्यानंतर निलंबित केले होते. नुकत्याच झालेल्या बैठकीत अधिकार्‍यांच्या सुरू असलेल्या अंतर्गत चौकशीच्या निष्कर्षांचा आढावा घेण्यात आल्यानंतर 10 महिन्यांहून अधिक काळ निलंबित असलेल्या गोपाळे आणि कोरके या अधिकार्‍यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले. (Parambir Singh)

 

परमबीर सिंह, गोपाळे, कोरके यांच्यासह अन्य 5 अधिकारी, संजय पुनमिया (Sanjay Punmia) आणि सुनील जैन (Sunil Jain) यांच्याविरुद्ध व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल (Shyamsundar Aggarwal) यांनी फसवणूक (Fraud Case) आणि खंडणी (Extortion Case) मागितल्याची तक्रार दाखल केली होती. परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण (DCP Akbar Pathan) यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांवर मुंबईत गुन्हा दाखल केला होता. केस मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा अगरवाल यांनी केला आहे.

अगरवाल यांच्या आरोपाच्या आधारवर परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्यासह 6 जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station) गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप आहे. शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) येताच नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके पुन्हा सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे.

 

परमबीर हे मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल
यांना मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करून अटकेची धमकी परमबीर यांनी दिली होती.
अगरवाल यांच्याकडे नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांनी 50 लाखांची खंडणी मागितली.
याप्रकरणात चौकशीनंतर सीआयडीने (CID) गोपाळे आणि कोरके यांना अटक केली होती.

 

 

Web Title :- Parambir Singh | Two suspended police officer in mumbai ex cp parambir singh extortion case reinstated

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Fire News | पुण्यातील वडगाव शेरीमध्ये गोदामाला भीषण आग, सिलिंडरच्या स्फोटाने परिसर हादरला

Marriage Bank Loan | लग्न थाटामाटात करायचंय? मिळू शकते लोन, बँकेत जाण्याचीही नाही गरज, Online असं करा Apply

MNS | ’50 खोके सामना ‘OK’, शिंदे-फडणवीस सरकारच्या जाहिरातीवर मनसेचा शिवसेनेला खोचक टोला