PI घाडगे प्रकरणावरून परमबीर सिंग अडचणीत; कधीही अटक होण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी गंभीर आरोप केले होते. यावरून परमबीर यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यामधील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार आता परमबीर सिंग यांना कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते.

पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी परमबीर यांच्यावर अंडरवर्ल्ड सोबत संबंध असल्याचे आरोप करत गंभीर तक्रार केली होती. यानंतर परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता या प्रकरणात परमबीर सिंग यांना कधीही अटक होवू शकते. असे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते. या दरम्यान, पीआय भिमराव घाडगे यांना एका खोट्या चकमक प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अडकविले होते. काही बिल्डरांना गुन्ह्यातून वाचविण्यास परमबीर यांनी पीआय घाडगे यांना सांगितले होते. मात्र, त्या बिल्डरांच्या विरोधात मजबूत पुरावे असल्याने त्यांना वाचवू शकत नाही, असे सांगत घाडगे यांनी परमबीर सिंग यांना नकार दिला होता. तर घाडगे हे आपले ऐकत नसल्याने परमबीर यांनी कट रचत एका खोट्या चकमकीच्या गुन्ह्यात त्यांना अडकविले होते. परंतु, यावरून तपास केला असता त्या गुन्ह्यामधून पीआय घाडगे याना कोर्टाने निर्दोष सोडले होते.

या दरम्यान, माजी पोलीस आयुक्त परमबीर यांच्या जवळच्या ६ व्यक्तींवर गंभीर स्वरुपाचे पुराव्यासहती गुन्हे दाखल केल्यामुळे घाडगे यांच्यावर परमबीर यांनी खोटे गुन्हे दाखल केले होते. एवढेच नाही तर घाडगे यांना त्यांच्या पत्नीसह एखाद्या कुख्यात गुन्हेगारासारखे किंवा आतंकवादी असल्यासारखे दाखवून त्यांना नवी मुंबई येथील तळोजा कारगृहात अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. कोणताही गुन्हा नसताना पीआय भीमराव घाडगे आणि त्यांच्या पत्नीने १ वर्ष २ महिने अंडासेलमध्ये घालविले होते.