मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची आणखी एका प्रकरणामध्ये चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. पोलिस अधिकरी अनुप डांगे यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचार आणि अंडरवल्डशी यांचा संबंध असल्याचे आरोप केले होते. यावरून हे आदेश दिले असल्याचे समोर आले आहे. या आदेशावरून या प्रकरणावरून परमबीर सिंग यांची चौकशी हे राज्याचे पोलीस महासंचालक DGP संजय पांडे यांच्याकडुन होणार आहे.

गावदेवी पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी कशा प्रकारे परमबीर सिंग यांनी पदाचा गैरवापर केला. त्यांचे अंडरवल्डशी कसे संबध आहे, असे लिखित पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल होत. तर अनुप डांगे यांच्या पत्राची दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, याची चौकशी सध्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे हे करत आहेत. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करावी अशा सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या.

या दरम्यान, यापूर्वी संजय पांडे यांच्या जवळ परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे शंभर कोटी वसूली करण्यास सांगत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. तर या प्रकरणी परमबीर सिंग यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने हे प्रकरण CBI कडे चौकशीसाठी सोपवलं. त्यानंतर या प्रकरणात परमबीर सिंग, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे, अनिल देशमुख त्यांचे २ स्विस सहाय्यक, पोलिस दलातील १ डीसीपी, आणि एसीपीसह इतर काही जणांचे जबाब ही नोंदवले होते. यानंतर सध्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे हे दुसरं प्रकरण पुढं आलं आहे.