मोदी सरकार देतंय 50 हजार रूपये, जाणून घ्या PKVY योजनेबद्दल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहे. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यावर केंद्रातील मोदी सरकारचा भर आहे. मात्र, बहुतेक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याची पद्धती माहित नाही. त्याची बाजारपेठ कुठे आहे ? त्यासाठी लागणारे सरकारी प्रमाणपत्र कुठे मिळते अशा अनेक गोष्टींपासून शेतकरी लांब आहे. शेतकऱ्यांना या सर्व गोष्टींची माहिती व्हावी यासाठी सरकारने सेंद्रीय शेती पोर्टल (http://www.jaiviksheti.in) तयार केले आहे. या पोर्टलवर शेतकऱ्यांना सर्व माहिती मिळू शकते. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने PKVY म्हणजेच परंपरागत कृषी विकास योजना तयार केली आहे. त्यामुळे आपल्या नैसर्गिक शेतासाठी प्रतिहेक्टरी 50 हजार रुपये मिळत आहेत.

PKVY योजना म्हणजे काय ?
सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने ही योजना सुरु केली आहे. 2004-05 पासून भारतातील सेंद्रिय शेतकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष वाढले आहे. जेव्हा सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय प्रकल्प (NPOF) सुरु झाला. तेव्हा नॅशनल सेंटर ऑफ सेंद्रिय शेतीनुसार 2003-04 मध्ये देशात केवळ 76 हजार हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती होत होती. जी 2009-10 मध्ये 10 लाख 85 हजार 648 हेक्टरवर पोहचली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अहवालानुसार सध्या 27.77 लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती केली जाते.

भारतात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, झारखंड आणि आसाम हे राज्य सेंद्रिय शेतीमध्ये चांगली प्रगती करत आहेत. सेंद्रीय शेतीसाठी आंतरराष्ट्रीय पात्रता केंद्राच्या (ICCOA) नुसार 2020 पर्यंत देशातील सेंद्रिय उत्पादनाची बाजारपेठ 150 कोटी डॉलर म्हणजे 11 हजार 250 कोटी रुपयांची असेल.

PKVY योजनेंतर्गत 50 हजार मिळतात
2017-18 या वर्षामध्ये 4.58 मेट्रिक सेंद्रिय उत्पादने निर्यात करण्यात आली. यामुळे देशाला 3453.48 कोटी रुपये मिळाले. यूएस, ईयू, कॅनडा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, इस्त्राईल, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, न्यूझीलंड आणि जपान हे देश भारतातील सेंद्रिय उत्पादनांचे प्रमुख आयातदार आहेत. या योजनेंतर्गत 50 हजार रुपये दिले जातात. त्याअंतर्गत तीन वर्षासाठी हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत दिली जाते. सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशके आणि गांडूळ खत खरेदीसाठी सरकार 31 हजार देते. ईशान्येकडील मिशन अ‍ॅर्ग्रेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट अंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठे खरेदीसाठी तीन वर्षात प्रतिहेक्टरी 7500 रुपयांची मदत केली जाते.

सेंद्रीय शेतीचे प्रमाणपत्र कसे मिळेल ?
सेंद्रीय शेतीचे प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अगोदर अर्ज करावा लागतो तसेच फी देखील भरावी लागते. प्रमाणपत्र घेण्यापूर्वी माती, खत, बियाणे, पेरणी, सिंचन, कीटकनाशके, काढणी, पॅक करणे आणि साठवण यासह प्रत्येक टप्प्यात सेंद्रिय सामग्री आवश्यक आहे. हे सिद्ध करण्यासाठी वापरलेल्या साहित्याची नोंद ठेवावी लागते. नोंदीची सत्यता तपासण्यात येते. त्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते.