बृहन्मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी परम बीर सिंह यांची नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बृहन्मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे हे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक परम बीर सिंह (आयपीएस – 1988) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय बर्वे यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

परम बीर सिंह यांची बृहन्मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी नियुक्ती झाल्याने त्यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा पदभार हा अतिरिक्त कार्यभार म्हणून अप्पर पोलिस महासंचालक बिपिन के. सिंग (आयपीएस-1990) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. परम बीर सिंह यांनी यापुर्वी पोलिस महासंचालक कार्यालयात विविध पदावर तसेच ठाणे पोलिस आयुक्त म्हणून देखील कर्तव्य बजावले आहे.