Paranjape Builders Latest News | विलेपार्ले पोलिसांनी सखोल चौकशीअंती बिल्डर परांजपे बंधूंना सोडलं; गुरूवारी राहत्या घरातून घेतलं होतं ताब्यात

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – शहरातील प्रसिध्द परांजपे बिल्डर (Paranjape Builders) कुटुंबाच्या विलेपार्ले (vile parle) येथील जमिनीच्या प्लॉट प्रकरणी दाखल असलेल्या गुन्हयात गुरूवारी रात्री चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या श्रीकांत पुरूषोत्तम परांजपे (63) Srikanth Purushottam Paranjape आणि शशांक पुरूषोत्तम परांजपे (59) Shashank Purushottam Paranjape यांना आज (शुक्रवारी) सायंकाळी 5 वाजता सोडून देण्यात आलं असल्याची माहिती विलेपार्ले पोलिस ठाण्याच्या (vile parle police station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक अलका मांडवे (Senior Police Inspector Alka Mandve) यांनी पोलीसनामा ऑनलाइनला (Policenama Online) दिली आहे. गुरूवारी रात्री परांजपे बंधूंना (Paranjape Builders) पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर पुण्यात प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र, सखोल चौकशीअंती बिल्डर परांजपे बंधूंना (Paranjape Builders) सोडून देण्यात आलं आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

परांजपे कुटुंबाशी संबंधित असलेल्या 70 वर्षीय महिलेने याबाबत विलेपार्ले पोलिस ठाण्यात (vile parle police station) तक्रार दिली होती.
त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाच्या तपासाच्या चौकशीसाठी श्रीकांत परांजपे (Srikanth Paranjape) आणि शशांक परांजपे (Shashank Paranjape) यांना पोलिसांनी बोलावलं होतं
असं पोलिस उपायुक्त मंजुनाथ शिंगे (Deputy Commissioner of Police Manjunath Shinge) यांनी यापुर्वीच स्पष्ट केलं होतं.
शुक्रवारी अगदी दुपारपर्यंत परांजपे बंधूंकडे चौकशी सुरू होती.
सखोल चौकशीअंतील श्रीकांत परांजपे (Srikanth Paranjape) आणि शशांक परांजपे (Shashank Paranjape) यांना सोडून देण्यात आलं आहे.
दरम्यान, विलेपार्ले पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात श्रीकांत आणि शशांक परांजपे यांची नावे आहेत. प्रकरणाचा अद्यापही तपास सुरू आहे.
मात्र, सध्यातरी चौकशीअंती परांजपे बंधूंची (Paranjape Builders) सुटका करण्यात आली आहे. प्रकरणाचा अधिक तपास विलेपार्ले पोलिस ठाण्यातील (vile parle police station) पोलिस अधिकारी करीत आहेत.

Web Title :  Paranjape Builders Latest News | Vile Parle police released builder Paranjape brothers after a thorough investigation; both was taken into custody from his residence on Thursday

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Crime Branch Police | पुण्यातील बड्या व्यावसायिकाकडून 50 लाखाची खंडणी घेताना दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, औंध परिसरात थरार