पॅरासेलिंग करताना पुण्यातील बापलेक कोसळले ; १५ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – मुरुड समूद्रकिनाऱ्यावर पॅरासेलिंग करताना दोरी तुटून पुण्यातील बापलेक खाली पडले. त्यात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त दोघे पुण्यातील कसबा रोड येथील राहणारे आहेत.

वेदांत गणेश पवार (१५) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर गणेश पवार हे गंभीर जखमी झाले आहेत.

गणेश पवार पुण्यातील कसबा रोड परिसरात राहतात. ते सुट्टी लागल्याने कुटुंबासह मुरड समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले. शनिवारी सकाळी गणेश पवार आणि त्यांचा मुलगा वेदांत असे दोघे समुद्र किनाऱ्यावर पॅरासेलींग करत होते. त्यावेळी त्यांनी उंचावर झेप घेतली मात्र काही वेळातच दोर तुटले. आणि दोघेही जमीनीवर कोसळले. त्यात वेदांतचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश पवार यांना जबर मार लागला आहे. वेदांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तर गणेश पवार यांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पॅरासेलिंग चालकाविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.