Coronavirus in Parbhani : परभणी जिल्हयातील 112 पोलिसांना कोरोनाची लागण

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढला आहे. दिवसेंदिवस झपाट्याने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. तर परभणी जिल्ह्यात सुद्धा कोरोनाने विस्फोट केला आहे. काल बुधवारी एका दिवसात तब्बल ११७२ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर २० जणांनी आपला जीव गमावला आहे. तर चिंताजनक म्हणजे त्यातच या दिवशी पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये जवळपास ११२ पोलीस कोरोनाबाधित आढळले आहेत. तर त्यांच्यावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. तर काही पोलीस गृह विलगीकरणात आहेत. तर दोघा पोलिसांना कोरोना लढाईत अपयश आले.

परभणी शहरात कोरोना विषाणूने घर केले आहे. २४ तास अहोरात्र आपल्या कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना सुद्धा कोरोनाने वेढा घातला आहे. ११२ पोलीस पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये १६ पोलीस अधिकारी आहेत. कर्मचारी ८६ तर होमगार्ड १० एवढ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. राज्य शासनाने दिलेल्या नियमाच्या सूचनांची अंमलबाजवणी सगळीकडे व्हावी यासाठी पोलीस सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. तर राज्य शासनाने संचारबंदीचा निर्णय घेतला. यामुळे कालपासून १५ दिवस जाडा ताण पोलीस दलावर पडणार आहे. काटेकोर नियमांचे पालन व्हावे यासाठी विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या व्यक्तींना प्रतिबंध करणे, विना मास्क फिरणारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करणे या गोष्टी बंधनकारक झाल्या आहेत. यामध्ये अनेक पोलीस कोरोनाच्या विळख्यात सापडत असून पोलीस दलाची जबाबदारी वाढली आहे.

दरम्यान, परभणी जिल्ह्यात सध्या एकूण पोलीस दलातील बाधितांची संख्या २५८ इतकी आहे. त्यामध्ये ४१ अधिकारी, २०३ कर्मचारी, ११ होमगार्ड, २ लिपीक आणि वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यासह ३ पोलीस निरीक्षक, ३ साहाय्यक पोलीस निरीक्षक, ९ फौजदारा आणि एका शिपायाचा समावेश आहे. तसेच ६ जणांनी प्राण गमावला आहे. तर सध्या उपचाराखाली पोलीस ११२ जण आहे.