परभणी : बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेला शेतकरी नदीपात्रात बुडाला

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील ( मसला खुर्द ) तालुका पाथरी येथील शेतकरी बैलांना पाणी पाजण्यासाठी नदीपात्रात गेला असता पाय घसरल्याने मृत्यू पावला. ही घटना ( 10 ) सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास पाथरी तालुक्यातील मसला खुर्द येथे घडली. तुकाराम होनमाने वय ( 70 ) वर्ष असे मयताचे नाव आहे. तुकाराम होनमाने हे बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले होते. दुथडी भरलेल्या गोदापात्रात त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात बुडून मृत्यू पावले.

मसला खुर्द येथील ग्रामस्थांच्या वतीने मृत तुकाराम होनमाने यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ( 11 ) सप्टेंबर रोजी मसला खुर्द शिवारातील नदीपात्रात तुकाराम होनमाने मृतावस्थेत दिसून आले. बैलाला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नदीपात्रात पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्यावरून तलाठी विठ्ठल नागरगोजे, मंडळ अधिकारी प्रकाश गोवंदे, यांनी घटनास्थळी पोहोचून वरिष्ठांना सविस्तर माहिती दिली. पाथरी पोलिसात सखाराम होनमाने यांनी माहिती दिल्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. तुकाराम होनमाने यांचे शवविच्छेदन झाल्याचे कळते. मसला खुर्द येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याचे असे ही कळते. तुकाराम होनमाने पाण्यात बुडून मृत्यू पावल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.