Parbhani Accident News | चालकाचा डोळा लागल्याने ट्रकची उसाच्या ट्रॉलीला जोरदार धडक; चालकाचा जागीच मृत्यू

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – Parbhani Accident News | परभणीमध्ये एक डुलकी ट्रक चालकाच्या जीवावर बेतली आहे. या सिमेंटचे पोते घेऊन जाणाऱ्या अपघातग्रस्त ट्रकने उसाच्या ट्रॉलीला जोराची धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. ही धडक एवढी भयंकर होती कि अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ट्रॅक्टरचा चालक या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. परभणीच्या मानवत तालुक्यातील राणी टाकळी जवळील हमदापुर पाटील जवळ हा भीषण अपघात (Parbhani Accident News) झाला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
चंद्रपूर येथून बीडकडे सिमेंटचे पोते घेऊन टी. एस 01 युसी 5556 हा ट्रक जात होता. ट्रक पोखरणी ते पाथरी रोडवरील रामेटाकळी जवळील हमदापूर पाठी जवळ आला असता त्याने पहाटे चार वाजताच्या सुमारास उसाच्या ट्रॉलीला जोराची धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील जखमी ट्रॅक्टर चालकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामध्ये (Parbhani Accident News) ट्रक चालक बासीद सिराजोद्दीन (रा. हरियाणा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर चालक बंडू उर्फ नवनाथ जाधव (रा. कोक्कर कॉलनी ता. मानवत) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी ट्रॅक्टर चालकावर मानवत येथील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच मानवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश स्वामी,
सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, प्रभाकर कापुरे, पोलिस कर्मचारी भरत नलावडे, मधुकर चट्टे, शेख जावेद,
विष्णु चव्हाण घटनास्थळी दाखल झाले आहेत. यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह
उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. ट्रक चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक
तपासात समोर आले आहे.

Web Title :Parbhani Accident News | truck hits sugarcane trolley kills driver on the spot

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sada Sarvankar | शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांना ‘त्या’ प्रकरणात पोलिसांकडून ‘क्लिन चीट’

Urfi Javed | उर्फी जावेदने ‘या’ कारणामुळे खतरो के खिलाडी कार्यक्रमास दिला नकार