Parbhani Accident | झेंडावंदनला जाताना रील बनवणं बेतलं जीवावर, भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात प्रजासत्ताक दिन (Republic Day) उत्साहात साजरा केला जात असताना परभणीत गालबोट लागले आहे. झेंडावंदनाला (Flag Hoisting) एकाच गाडीवरुन जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा भीषण अपघात (Parbhani Accident) झाला. यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू (Student Death) झाला तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी (Seriously Injured) झाले आहेत. अपघात झाला त्यावेळी हे विद्यार्थी गाडीवर रील तयार करत होते. हे विद्यार्थी ‘मेला’ चित्रपटातील ‘डर है तुझे किस बात का?’ या गाण्यावर रील तयार करत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर (Parbhani Accident) विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

शंतनू सोनवणे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर स्वप्नील चव्हाण, राहुल तिथे, योगानंद घुगे (सर्व रा. डाकू पिंपरी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी आंबेजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान, शंतनू सोनवणेचा मृत्यू झाला.

ही घटना (Parbhani Accident) गुरुवारी (दि.26) सकाळी सातच्या सुमारास पाथरी सोनपेठ मार्गावर (Pathari Sonpeth Road) घडली. हे सर्व विद्यार्थी कानसुर येथील चक्रधर स्वामी विद्यालयात (Chakradhar Swamy Vidyalaya) इयत्ता नववीत शिकत असून प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत झेंडावंदनासाठी जात होते. या अपघातानंतर चार जणांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात हे चारजण शाळेकडे जात असताना पाथरी सोनपेठ मार्गावर रील बनवत होते. हा व्हिडिओ अपघातापूर्वी काही वेळ अगोदरचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौघेजण एकाच गाडीवरून शाळेत झेंडावंदनासाठी जात असताना गाडीवर रील बनवण्याच्या नादात त्यांच्या
दुचाकीला ऑटोने धडक दिली. यात चारही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की
एका विद्यार्थ्याचा हात रस्त्यावर तुटून पडल्याचे उपस्थितांनी सांगितेल.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Parbhani Accident | parbhani accident reel shoot of four riding on the one bike one died

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Graduate Constituency | नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपचा पाठिंबा सत्यजीत तांबेंना नाही तर ‘या’ उमेदवाराला?; एका नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधान…

Maharashtra Police | पोलीस दलातील ‘बँड्समन’ची पदं कधी भरणार?, DGP आणि गृह विभागाला म्हणणे सादर करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश