Parbhani : जिल्ह्यातील मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक

परभणी : पोलिसनामा ऑनलाईन– जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुका घेणे शक्य ठरत नसल्याने तसेच योग्य ती व्यक्ती निवडण्याच्या राज्य शासनाच्या विचाराधीन असलेला हा विषय न्यायालयात आहे. मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतचा कारभार शासन नियुक्त अधिकारी कर्मचारी पाहणार आहेत. परभणी जिल्ह्यातील परभणी गंगाखेड सेलू सोनपेठ पाथरी पूर्णा पालम जिंतूर मानवत तालुक्यातील मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास साधून पुढील निवडणुकीस सामोरे जाण्याच्या अनेकांच्या या विचारावर करोना काळामुळे विरजण पडले आहे. त्यामुळे गावातील मातब्बरांना काही काळ वाट पाहावी लागणार. अनेक नवे चेहरे नव्या दमाने तयारीला लागले. कोरोनाची ही परिस्थिती किती काळ राहील हे मात्र सांगणे शक्य नाही. दिनांक 13 ऑगस्ट 17 ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या एका आदेश परिपत्रकात पुढील प्रमाणे संपुष्टात आलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायती परभणी (87), गंगाखेड (68), मानवत (39), सोनपेठ (34), सेलू (66), जिंतूर (83), पाथरी (42), पालम (38), पूर्णा (61) वरील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहे. त्यांच्या आदेशाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त होणार. नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांनी तात्काळ आपला पदभार स्वीकारावा असे आदेशात म्हटले आहे.