राष्ट्रवादीकडून उद्या परभणी बंद !

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परभणी शहरासह जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालय, बाजारपेठा बंद ठेवून निषेध नोंदवणार जाणार असल्याचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कारभारात बाबतीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कुठल्याही प्रकारचे खा. शरद पवार यांचे संबंध नसतानाही केवळ राजकीय सूडापोटी खा. पवारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांची स्वाक्षरी आहे.

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ उद्या गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परभणी जिल्ह्य़ातील शाळा महाविद्यालय तसेच बाजारपेठा बंद ठेवून निषेध नोंदवणार येणार असल्याचे जिल्हा राष्ट्रवादीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Visit : policenama.com