परभणी : समृद्ध विकासासाठी भाजपाला पुन्हा सत्तेत आणा : योगी आदित्यनाथ

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – जिंतूर विधानसभा मतदार संघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवाराच्या प्रचारार्थ सेलु येथे उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा गुरुवारी (दहा ऑक्टोंबर) रोजी सकाळी संपन्न झाली.

यावेळी आयोजित सभेत योगी आदित्यनाथ यांनी जिंतूर मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांना निवडून देण्याचे आवाहन केले .

सभेस महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सेलू चे नगराध्यक्ष विनोद बोराडे, भाजप जिल्हाध्यक्ष अभय चाटे, तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर, यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

शेतकरी, शेतमजूर, महिला व युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्तेत आणावे असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.

जिंतूर – सेल विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवारच्या मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ सेलु येथील पाथरी रोडवरील बोर्डीकर मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, भाजपा हा विकास करणारा पक्ष आहे, केंद्रात भाजपचे सरकार आहे. राज्यातही भाजपचे सरकार येणार आहे, मतदार संघाचा सर्वागीण विकास साध्य करण्यासाठी जिंतूर-सेलू मतदार संघातून भाजप-शिवसेना महायुतीच्या उम्मेदवार मेघना बोर्डीकर यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी आयोजित जाहीर सभेला उपस्थितांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे पहायला मिळाले.

Visit : Policenama.com 

You might also like