पृथ्वीराज बी. पी. यांची लातूर येथे जिल्हाधिकारी पदावर बदली

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पृथ्वीराज बी. पी. (B.P. Prithviraj) लातूरचे जिल्हाधिकारी (District Collector) म्हणून त्यांची बदली (Transferred) झाली असून, त्यांच्या जागी एस.टी. टाकसळे (S.T.Taksle) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. जिल्हा परिषदेत एक कडक व शिस्तबद्ध अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोरोनाच्या कार्यकाळात ते जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच जिल्हा परिषदेच्या कोरोना विभागाचे प्रभारी होते. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) सुजाता सौनिक यांनी मंगळवारी (दि. 8 डिसेंबर) पृथ्वीराज यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.

पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते; तसेच त्यांच्या पत्नी माजी जि.प. उपाध्यक्षा भावना नखाते यांनी पृथ्वीराज बी. पी. यांना निरोप दिला.