Parbhani Crime | दुर्देवी ! शाळेत जाताना काळाने केला मोठा घात; ट्रकच्या धडकेत 3 भावडांचा मृत्यु

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – Parbhani Crime | परभणी जिल्ह्यातील (Parbhani Crime) जिंतूरमधील ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत (Accident) तीन भावांचा मृत्यू (Died) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खरंतर शाळा आणि महाविद्यालयाच्या पहिल्यादिवशी जाण्यासाठी निघालेल्या या तिन्ही भावांवर काळाने घाला घातला आहे. ही घटना आकोली शिवारामध्ये घडली. अभिषेक काशिनाथ म्हेत्रे (Abhishek Kashinath Mhetre) (वय 18), योगेश काशिनाथ म्हेत्रे (Yogesh Kashinath Mhetre) (वय 15), रामप्रसाद विश्वनाथ म्हेत्रे (Ramprasad Vishwanath Mhetre) (वय 20) अशी मृत भावांची नावे आहेत.

 

 

याबाबत माहिती अशी की, कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी आल्याने आजपासून (सोमवार) शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी तिन्ही भावंडे महाविद्यालयात जाण्यासाठी टूव्हीलर वरून निघाले होते. जिंतूर तालुक्यातील आकोली शिवारामध्ये पोहोचले असता समोर येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या जोराच्या भीषण अपघातात (Accident) तिन्ही भावंडांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे. (Parbhani Crime)

 

 

अभिषेक म्हेत्रे आणि योगेश म्हेत्रे ही दोघेही सख्खे भाऊ आहे. या तिन्ही भावंडाच्या अपघातील मृत्यू मुळे कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्देवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर मृत भावडांचे पार्थिव, जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
याबाबत पुढील तपास पोलीस (Police) करीत आहेत.

 

Web Title :- Parbhani Crime | a truck hit a two wheeler 3 brothers on the spot dead at jintur parbhani

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Congress | PM नरेंद्र मोदी यांनी मुलींबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल पुणे शहर महिला काँग्रेसतर्फे निषेध (व्हिडिओ)

 

Priyanka Chopra Jonas | प्रियंका चोप्राला तिच्या प्रियकरासोबत रूममध्ये रंगेहात पकडले, संतापलेल्या मावशीने केले ‘हे’ काम

 

Dental Care Tips | दात पिवळे आहेत का? ‘या’ 4 परिणामकारक घरगुती उपायांनी होतील पांढरे शुभ्र आणि चमकदार