Parbhani Crime | कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या, परभणी जिल्ह्यात खळबळ

0
184
Parbhani Crime | Farmer suicide over loan distress in jintur taluka of parbhani
Parbhani Crime

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – बँकेचे घेतलेल्या कर्जाची (Bank Loan) परतफेड करता येत नसल्याने एका शेतकऱ्याने (Farmer) गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Suicide In Parbhani) केल्याची घटना परभणी जिल्ह्यात (Parbhani Crime) घडली आहे. गोपाळ रामराव चौधरी Gopal Ramrao Chaudhary (वय-39 रा. बोरी, ता. जिंतूर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून तणावातून त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास (Parbhani Crime) घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवार (दि.28) सकाळी उघडकीस आला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील (Parbhani Crime) जिंतूर तालुक्यातील (Jintur Taluka) बोरी येथील शेतकरी गोपाळ चौधरी यांचे वडील रामराव चौधरी यांच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बोरीचे (State Bank of India Branch Bori) 11 लाखाचे कर्ज आहे. तर तुळजाभवानी अर्बन बँकेचे (Tulja Bhavani Urban Bank) 51 हजार रुपयांचे कर्ज गोपाळ चौधरी यांच्या नावावर होते. मयत गोपाळ चौधरी हे त्यांचे वडील व भाऊ यांच्यासोबत शेतीचे काम पाहात होते.

 

बँकेचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत गोपाळ चौधरी होते. मागील काही दिवसांपासून ते तणावाखाली (Tension) होते.
याच तणावातून रविवारी (दि.27) मध्यरात्री शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबार दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

Web Title :- Parbhani Crime | Farmer suicide over loan distress in jintur taluka of parbhani

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दरवाढीविरोधात प्रतिकात्मक अंतयात्रा तर कार्यकर्त्यांनी मुंडन करत नोंदवला निषेध

 

Hindu Minority Affidavit In Supreme Court | केंद्र सरकारचा हिंदू अल्पसंख्यांक बाबत सुप्रीम कोर्टात ‘हा’ युक्तिवाद

 

Diabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांनी करावे ‘या’ 4 गोष्टींचे सेवन, बॅलन्स राहील ब्लड शुगर; जाणून घ्या सविस्तर