Parbhani Crime | धक्कादायक ! पतीने घेतला गळफास तर पलंगावर पत्नीचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – Parbhani Crime | परभणी येथील एकाच घरात पती व पत्नीचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील राजीव गांधी नगर (Rajiv Gandhi Nagar, Parbhani) येथील पती व पत्नीचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अर्जून गणेश आवटे (Arjun Ganesh Awate) (वय 32 व प्रियंका अर्जून आवटे (Priyanka Arjun Awate) (वय 28) अशी पती-पत्नीची नावे आहेत. ही घटना सोमवारी 28 मार्च रोजी सकाळी 7 च्या वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. (Parbhani Crime)

 

याबाबत माहिती अशी, की अर्जुन गणेश आवटे रिक्षाचालक आहे. तो पत्नी प्रियंका सह राजीव गांधी नगरात राहत होता. तीन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. रविवारी रात्री जेवणानंतर हे दोघे घरातील एका खोलीत झोपले होते. सोमवारी सकाळी 7 वाजले तरी दोघेही खोलीच्या बाहेर न आल्याने अर्जुनच्या बहिणीने दरवाजा ठोठावला. परंतु. तरी देखील आतमधून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे कुटूंबीय अस्वस्थ झाले. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले. (Parbhani Crime)

 

त्यावेळी अर्जुनने नायलॉनच्या दोरीने गळफास (Noose) घेतलेला तसेच प्रियंकाही मृतावस्थेत पलंगावर आढळून आले. या घटनेमुळे कुटुंबाला धक्का बसला. दरम्यान, या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड (Police Inspector Raosaheb Gadewad) यांनी घटनास्थळाची भेट दिली. त्यानंतर पंचनामा करण्यात आला.

 

Web Title :- Parbhani Crime | husband wife both are dead body found in the house at selu of parbhani district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दरवाढीविरोधात प्रतिकात्मक अंतयात्रा तर कार्यकर्त्यांनी मुंडन करत नोंदवला निषेध

 

Hindu Minority Affidavit In Supreme Court | केंद्र सरकारचा हिंदू अल्पसंख्यांक बाबत सुप्रीम कोर्टात ‘हा’ युक्तिवाद

 

Diabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांनी करावे ‘या’ 4 गोष्टींचे सेवन, बॅलन्स राहील ब्लड शुगर; जाणून घ्या सविस्तर