Parbhani Crime News | शेतात काम करत असताना वीज कोसळून 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – Parbhani Crime News | मागच्या काही दिवसांपासून राज्यात वाळवीच्या पावसाने थैमान घातले आहे. यादरम्यान परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतामध्ये काम करत असताना अंगावर वीज पडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शेतामध्ये काम करत असलेल्या ओमकार भागवत शिंदे या 15 वर्षीय मुलाच्या अंगावर अचानक वीज कोसळली. यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Parbhani Crime News)

अशीच एक घटना परभणी तालुक्यातील साडेगाव शिवारामध्ये घडली. यामध्ये शेतात काम करत असताना अंगावर विज पडून बाबाजी केशव नाहातकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर द्वारकाबाई भागवत शिंदे यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परभणीमध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. (Parbhani Crime News)

या पावसामुळे एकाच दिवशी वीज पडून 4 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
एवढेच नाहीतर तर परभणीतील सोनपेठ तालुक्यातील तडी पिंपळगाव या ठिकाणी शेतामध्ये बांधलेल्या
दोन बैलाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्या बैलांचादेखील मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण
परभणी जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title :- Parbhani Crime News | 15 year old boy died due to lightning in parbhani sonpeth

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी चिंचवडमध्ये झळकले कुख्यात गुन्हेगार नीलेश घायवळच्या वाढदिवसाचे बॅनर्स, प्रचंड खळबळ

CCTV In Police Stations | राज्यातील 1 हजार 82 पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत – देवेंद्र फडणवीस

Maharashtra Farmer News | शेतकर्‍याची यशोगाथा ! मेहनत, जिद्द आणि शासनाची साथ; खडकाळ माळरानावर फुललेल्या फळबागेचा शेतकऱ्याला हात