Parbhani Crime News | धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहित महिलेचा केला गर्भपात

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – Parbhani Crime News | परभणी जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका विवाहितेला आयुर्वेदिक औषध देऊन सासरच्या मंडळींनी तिचा गर्भपात केला आहे. सासरची मंडळी तिच्याकडे घर बांधण्यासाठी माहेरवरून तीन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत होते. तसेच तिचा छळ करत होते. यादरम्यान पीडित विवाहित महिला गर्भवती राहिल्याने सासरच्या मंडळींनी तिचा गर्भपात केला आहे. या प्रकरणी उच्चशिक्षित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या मंडळी विरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Parbhani Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
वकील असलेल्या माधुरी टिळकीकर (Advocate Madhuri Tilkikar) यांचे लग्न 27 जून 2021 रोजी नांदेडच्या हडकोमधील शाहू नगरमध्ये राहणाऱ्या स्वप्निल मधुकर टिळकीकर यांच्याशी झाले. लग्न झाल्यानंतर माधुरी यांचे काही दिवस सुखात गेले. मात्र त्यानंतर सासरच्या मंडळींनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. सासू आणि पतीने तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) सुरू केली. तुला काम येत नाही, तुला कपडे धुता येत नाहीत, तुला स्वयंपाक करता येत नाही, असे म्हणत माधुरीला किचनमध्ये जाण्यापासून अडवत होते. यानंतर सासरच्या मंडळींनी घर बांधण्यासाठी माहेरवरून तीन लाख रुपये घेऊन ये असा तगादा माधुरीकडे लावला व तिचा छळ सुरु केला.

यानंतर ज्यांच्यासोबत सात फेरे घेतले त्या पतीनेदेखील तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी
(Threats to kill) दिली. हा सर्व प्रकार सुरू असताना माधुरी टिळकीकर या गर्भवती (Pregnant) राहिल्या.
यानंतर सासरच्या मंडळींनी आपली हद्द क्रॉस करत त्यांना आयुर्वेदिक औषध (Ayurvedic Medicine) देऊन
त्यांचा गर्भपात (Abortion) केला. यानंतर या सगळ्या जाचाला कंटाळलेल्या माधुरी टिळकीकर यांनी गंगाखेड
पोलीस ठाण्यात आपल्या सासरच्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी स्वप्नील टिळकीकर,
मधुकर टिळकीकर, आम्रपाली टिळकीकर, सोनाली मुळे, प्रशांत उर्फ गजु गवळी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गंगाखेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advt.

Web Title :- Parbhani Crime News | a well educated married woman aborted by giving ayurvedic medicine husband threatened to kill him

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mundhwa Premier League Cricket Tournament |‘मुंढवा प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धा ! महाराणा रॉयल्स् संघाला विजेतेपद

Ahmednagar ACB Trap | 10 हजार रुपये लाच घेताना महिला वैद्यकीय अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात