Parbhani Crime News | जनावरांना चारा टाकताना अनर्थ घडला, घोणस जातीच्या विषारी सापाने दंश केल्याने २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Parbhani Crime News | Disaster struck while feeding animals, 26-year-old farmer dies after being bitten by a venomous snake

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – Parbhani Crime News | सापाने दंश केल्याने २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. श्रवण बाबुराव राठोड (वय-२६) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना सोनपेठ तालुक्यातील नरवाडी गावात घडली.

अधिक माहितीनुसार, गुरुवार (दि. २४) रोजी दुपारी श्रवण हे जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले होते. यावेळी कडबा काढत असताना घोणस जातीच्या विषारी सापाने श्रवणच्या पायाला दंश केला. सापाने दंश केल्याचे श्रवण याच्या लक्षात आले. यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी नरवाडी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

दरम्यान आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने परळी येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील वैद्यकीय हॉस्पिटल येथे नेण्यात आले. दरम्यान या सगळ्यात श्रवण याच्यावर उपचार होण्यास विलंब झाल्याने सापाचे विष संपूर्ण अंगात पसरले. यात या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

Total
0
Shares
Related Posts