Parbhani Crime News | वहिनी जीव देईल, असा फोन येताच परभणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अन्…

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – Parbhani Crime News | नेहमीच पोलीस गुन्हा झाल्यावर तेथे पोहचतात असं नाही कारण परभणी शहरात पोलिसांनी तात्काळ केलेल्या हालचालींमुळे एका महिलेचा जीव वाचला आहे. त्यामुळे पोलिसांचं कौतुक देखील होत आहे. परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात राम नगर येथील रहिवाश्याने त्याचा भाऊ आणि वहिनी यांच्यामध्ये मोठं भांडण होत आहे, आणि हे भांडण विकोपाला जाऊ शकत असा फोन पोलिसांना केला आणि पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला. नवरा बायकोच्या भांडणानंतर बायकोने गळफास लावून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. मात्र घाबरलेल्या दिराने या घटनेची माहिती 112 नंबर डायल करून पोलिसांना कळवली होती. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत हालचाली केल्या. पोलीस वेळेत घरी पोहोचल्यामुळे गळफास घेतलेल्या महिलेचे प्राण वाचले आहे. (Parbhani Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?

अंगावर शहारे आणणारी ही घटना परभणी शहरातील राम नगर येथे घडली आहे. राम नगर येथील रहिवासी प्रसाद तळवलकर (नाव बदलले आहे) यांनी 112 या क्रमांकावर पोलिसांना फोन करुन त्यांचा भाऊ आणि वहिनी यांच्यामध्ये मोठं भांडण होत आहे यासाठी पोलिसांकडे मदत मागितली.पोलीस अधीक्षक कार्यालयात फोन आल्यानंतर तात्काळ या घटनेची माहिती नानलपेठ पोलिसांना देण्यात आली. कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार पवार, गृहरक्षक दलाचे जवान कदम यांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला संपर्क साधून त्वरित घटनास्थळी पोहचले. (Parbhani Crime News)

यावेळी महिलेने घराचे दार आतून बंद केले होते. महिला आतमध्ये साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले असता पोलिसांनी तातडीने घराचा दरवाजा तोडला आणि संबंधित महिलेला फासावरुन खाली उतरविले.
त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
तर नवरा – बायकोच्या भांडणांमध्ये महिलेने आत्महत्या करण्यासारखा टोकाचा निर्णय का घेतला असावा,
याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title :- Parbhani Crime News | parbhani police saves woman from ending life after receiving call from man about fight between brother and sister in law

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kartik Aaryan | कार्तिक आर्यनला पाहताच चाहती ढसा ढसा रडली; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Dr. Narendra Dabholkar Murder Case | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची उलटतपासणी

Bhandara Crime News | स्वस्तात दुचाकी घेऊन देण्याचे आमिष दाखवून 20 लाखांचा घातला गंडा