परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर वरपुडकर गटाचे वर्चस्व कायम

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – मार्चमध्ये वाढत्या तापमानासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे राजकारण तापले असल्याचे दिसून आले. यात नेहमीप्रमाणे यंदाही आजी-माजी आमदारांच्या दोन गटात निवडणुकीचा सामना पाहायला मिळाला. बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक दि. 21 मार्च रोजी रविवारी झाली व त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. आज 23 मार्च रोजी जाहीर झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निकालात वरपुडकर गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले. यात वरपूडकर गटाला 12 जागा मिळाल्या तर माजी आमदार बोर्डीकर यांच्या गटाला 9 जागा मिळाल्या. आजी-माजी आमदार असलेल्या या दोन्ही नेत्यांच्या गटात अटीतटीची लढत झाली. झालेल्या या लढतीत काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांच्या गटाने आपले वर्चस्व राखले.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी बोर्डीकर गटाकडून रस्सीखेच केली. तर वरपुडकर गटातून राजेश विटेकर मैदानावर होते. त्यांनी माजी आमदार बोर्डीकर यांच्या बंधूंचा एका मताने पराभव केला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेली. असल्याचे दिसून आले. आमदार वरपूडकर यांच्या गटाकडून विजयी संचालक… स्वतः आमदार वरपूडकर आमदार राजू नवघरे माजी आमदार सुरेश देशमुख माजी जिप अध्यक्ष राजेश विटेकर माजी आमदार साहेबराव पाटील, गोरेगावकर गणेशराव रोकडे, प्रेरणा वरपुडकर, विद्यमान अध्यक्ष पंडितराव चोखट, भगवानराव वाघमारे, अतुल सरोदे ,राजेश पाटील, गोरेगावकर बालाजी देसाई, यांचा समावेश आहे. तर बोर्डीकर गटाकडून विजय संचालक… स्वतः माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर त्यांच्या कन्या आमदार मेघना बोर्डीकर आमदार तानाजी मुटकुळे आमदार बाबाजानी दुर्रानी माजी खासदार शिवाजी माने भारतीय जनता पक्षाचे आनंद भरोसे भावना कदम बोर्डीकर यांचा समावेश आहे.

सारखे मते मिळाल्याने फेर मत मोजणी… विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघात बोर्डीकर गटाचे दत्तात्रय मायंदळे आणि वरपुडकर गटाचे स्वराजसिंह परिहार यांच्यात जोरदार झुंज झाली. ते पहायला मिळालं. दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने टाॅस करण्यात आला. यात दत्तात्रय मायंदळे भाग्यवान ठरले. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर गटाकडून मैदानात उतरलेले दत्तात्रेय मांदळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आहेत तसेच ते आमदार बाबाजानी दुर्रानी यांचे निकटवर्तीय मानले जातात