home page top 1

२० हजाराच्या लाच प्रकरणातील पोलिस उपनिरीक्षक, कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – जेसीबी मशिनवर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपायंची लाच पोलीस उपनिरीक्षकाने स्विकारली. मात्र, अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचल्याची चाहूल लागताच पोलीस उपनिरीक्षकाने आणि त्याचा साथिदार पोलीस शिपायाने लाचेच्या रक्कमेसह पलायन केले. हा प्रकार २० जून रोजी सायंकाळी घडला. याप्रकरणात दोघांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे.

सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबू गिते व शिपाई गौतम भालेराव आणि खासगी इसम लक्ष्मण फड असे पोलिसांनी अटक केल्यांची नावे आहेत. सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेकायदा सुरु असलेल्या वाळू उपशावरील जेसीबीवर कारवाई न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गिते आणि पोलीस शिपाई भालेराव यांनी तसेच एका खासगी व्यक्तीने तक्रारदाराकडे २० हजार रुपायांची लाच मागितली. लाचेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर २० जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परळी रस्त्यावर सापळा रचला. तक्रारदाराकडून लाच स्विकारल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गिते याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचल्याचे समजले. आपण पकडले जाऊ नये यासाठी गिते आणि भालेराव आणि खासगी इसम लक्ष्मण फड यांनी लाचेची रक्कम घेऊन तेथून फरार झाले.

या प्रकरणात बाबू गिते, गौतम भालेराव यांच्यासह खासगी इसम फड यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळेपासून तिघेजण फरार झाले होते. आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालायात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटालून लावला. त्यामुळे या तिघांनी शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजर झाले. त्यांना न्यायालयात हजर केले असतान ८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Loading...
You might also like