परभणी : बाभळगाव येथे एक गाव एक गणपती

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन- प्रत्येक गावात कोरोनाबद्दल जागरूकता पसरली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रत्येकजण यावर्षी सार्वजनिक ठिकाणी ऐवजी घरी गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देत आहे. त्यातूनच एक गाव, एक गणपती ही संकल्पना पुढे येत आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पाठी मागील दोन आठवड्यापूर्वी बाभळगावात कोरोना चा शिरकाव झाला आहे. एखाद्या वेळी रुग्ण वाढीचे प्रमाण दिसून आले असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विविध उपाय योजना करण्यात येतात. याव्यतिरिक्त, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणेशोत्सवात बरीच निर्बंधे घालण्यात आली आहे. जिल्हाभरातील अनेक गावात एक गाव, एक गणपती ही संकल्पना पुढे आली आहे.

कोरोनामुळे सार्वजनिक जीवन विस्कळीत झाले आहे आणि उद्योग मंदावला आहे. पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रूग्ण सापडून आल्याच्या पार्श्वभूमीवर बाभळगाव येथे ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना ग्रामस्थांनी स्वीकारली. गावातील प्रतिष्ठित मंडळींनी यासाठी पुढाकार घेतला. एक गाव एक गणपती या संकल्पनेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. समस्त मानव जातीवर संकट म्हणून आलेल्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर बाभळगाव ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे. एक गाव एक गणपती या संकल्पनेनुसार गावातील मुख्य स्थान असलेल्या गणेश मंदिरात श्री पोहचले आहेत.

बाभळगावातील गणेश मंडळांनी हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक गावात कोरोनाबद्दल जागरूकता पसरली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रत्येकजण यावर्षी सार्वजनिक ठिकाणा ऐवजी घरी व मंदिरांमध्ये गणेशोत्सव साजरा करीत आहे. यासाठी पोलीस व महसूल विभागाने पुढाकार घेतला. पाथरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी तीप्पलवाड यांनी बाभळगाव येथे भेट दिली. गावातील प्रतिष्ठित मंडळी सोबत चर्चा केली. यातूनच एक गाव एक गणपती ही संकल्पना ठेवण्यात आली. विघ्नहर्ता या कोरोनाच्या संकटाला टाळो अशी मनोकामना जनार्दन हरकळ (मामा) यांनी केली.