Parbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार ; पीडितेने उचलले ‘हे’ पाऊल

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – Parbhani Gang Rape | महाविद्यालयात शिकणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार (Parbhani Gang Rape) केल्याची घटना घडली. सोनपेठ तालुक्यात ही घटना घडली असून घटनेनंतर पीडितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पीडितेच्या आत्महत्येनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोनपेठ परिसरातील पीडितेला गेल्या दोन वर्षांपासून त्याच परिसरातील तीन मुले त्रास देत होते. 12 सप्टेंबरला या मुलांनी पीडितेला डिघोळ तांडा परिसरात बोलावून  तिच्यावर लैंगिक अत्याचार (Parbhani Gang Rape) केला. घटनेनंतर पीडित नैराश्यात आली होती तिने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अंबाजोगाई येथील रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तिला लातूरला हलवण्याचा सल्ला दिला. मात्र पीडित मुलीचा लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींवर विविध कलमांसह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य एकाचा शोध पोलीस घेत आहे.

या घटनेचा अधिक तपास सोनपेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे (PI Pradeep Kakde),
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने, पोलीस उपनिरीक्षक विष्णु गिरी,
पोलीस उपनिरीक्षक मंचक फड यांच्यासह सोनपेठ पोलीस (Sonpeth Police) करत आहेत.

Web Title :- Parbhani Gang Rape | 16 year old girl gang raped in parbhani victim commits suicide

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nagar Pune Highway Accident | नगर-पुणे महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; पिता-पुत्रासह 4 जण जागीच ठार 

Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीला 50 लाखांच्या खंडणीची मागणी; बळकाविला फ्लॅट, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | लोणी काळभोरमध्ये तरुणाचा गळा दाबून खून