परभणी ; लसीकरण करून घेत केला आदर्श निर्माण: सभापती अनिल नखाते यांचे लसीकरण

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा रुग्णालयात सभापती अनिल नखाते यांनी शुक्रवारी ( 09 ) एप्रिल रोजी लस घेतली. पात्र व्यक्तीने लसीकरण करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. अशातच सामाजिक जबाबदारी ओळखत पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांनी प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवारी लसीकरण करून घेतले.

सभापती नखाते यांनी लस घेत समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. पात्र व्यक्तीने लसीकरण करून घेण्यासाठी पुढे यावे यासाठी सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. कोरोना महामारी ला आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत वैज्ञानिकांनी कोरोना विरोधी लस तयार केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच काही ग्रामीण भागात लसीकरण केंद्राची उभारणी केली आहे.

या केंद्रात यापूर्वीच अनेकांनी लसीची मात्रा घेतली आहे. कोरोनावर लस हा एकमात्र उपाय आहे असे जाणकारांचे मत आहे. 9 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात पोहोचून सभापती अनिल नखाते यांनी लसीकरण करून घेतले आहे. प्रत्येक पात्र व्यक्तींनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखत लसीकरण करून घेण्यासाठी पुढे यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. राजकीय क्षेत्रातून पुढे येत राष्ट्रवादीचे नेते सभापती अनिल नखाते यांनी एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. या वेळी लसीकरण करून घेण्यासाठी पोहोचलेले सभापती नखाते यांच्या सोबत आमदार दुर्रानी यांचे स्वीय सहाय्यक योगेश महाजन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक दत्ता मायदळे यांची उपस्थिती होती