जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन, आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांवर गुन्हा

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – शनिवारी सकाळी महायुतीच्या भाजप व मित्रपक्षांनी अनुदान व दुधाचे दर वाढविण्याच्या मागणीसाठी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन केले. महायुतीच्या भाजप मित्र पक्षाच्यावतीने राज्य शासनाला अनुदान व दर वाढीची मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि गंगाखेड येथील आमदारांनी आंदोलन आपला सहभाग नोंदवला. जिंतूर शहरात आंदोलनकर्त्यां सोबत रस्त्यावर उतरून आमदार मेघना बोर्डीकर यांनी रस्ता रोको आंदोलन केले. गंगाखेड शहरातील परळी नाक्यावर महायुतीतील भाजप व रासप च्या वतीने रस्ता रोको आंदोलन करून पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

यावेळी रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आपला सहभाग नोंदवला. पाथरी येथे आंदोलनासाठी एकत्र आलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोना च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना व कोरोना संसर्ग प्रार्दुभाव होऊ नये यासाठी संचारबंदी, जमाव बंदी आदेश असतानाही शहरापासून दोन किलोमीटर दूर असलेल्या पाथरी मानवत रोड वरील पोखरणी फाटा येथे शनिवार (01) ऑगस्ट रोजी तुळजाभवानी दूध संकलन केंद्र समोर दरवाढी संबंधाने आंदोलकांनी घोषणा दिले.

सार्वजनिक शांतता राखण्यासाठी एकत्रित जमण्यासाठी मनाई आदेश असताना त्याचे भंग केल्याने यावरून पाथरी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई सचिन शिंदे यांनी फिर्याद दिल्याने ( १ ) सुभाष गंगाधर कदम ( २ ) माधव ज्ञानोबा नवघरे ( ३ ) बालासाहेब हरिभाव पाटील ( ४ ) उत्तमराव उध्वराव नाइक ( ५ ) पांडुरंग अभिमाण हाके ( ६ ) संतोष सावळीराम जोगदंड ( ७ ) बाबासाहेब जामगे ( ८ ) बाळासाहेब हरिभाउ जाधव ( ९ ) गोपाळ डुकरे ( १० ) डॉ.राजेंद्र चौधरी ( ११ ) सोहम प्रतापराव घाटुळ ( १२ ) मधुकर रामराव नाईक ( १३ ) सुभाष भांबट ( १४ ) शिवराज नाईक वरील आंदोलनकर्त्यांवर फिर्यादीवरून खालील कलमान्वये पो.स्टे . पाथरी गुरन : -२ ९ ५ / २०२० क १८८,२६ ९ , २७० , भा.द.वि सह कलम १३५ , मुपोका आपत्ती व्यवस्थापण अधिनीयम कलम ५१ अंतर्गत गुन्हा नोंद झाला.