परभणी लोकसभेसाठी खासदार संजय जाधव यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब 

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी लोकसभेसाठी शिवसेनेतर्फे २१ लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. त्यावेळी परभणी लोकसभेसाठी खासदार संजय जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली असल्याने, सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्व पक्षांनी आपआपले उमेदवार जाहीर करण्याचे सुरु केले आहे. याचदरम्यान शिवसेना लोकसभा मतदार संघांच्या २१ उमेदवारांची घोषणा घोषणा केली आहे. मुंबईतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही  घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे, २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये परभणी लोकसभा मतदार संघात शिवसेनेने भगवा फडकावला होता. त्यामुळे यंदाही शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांना पुन्हा उमेदवारीवर देण्यात आली आहे.

“गेल्या काही दिवसांपासुन परभणी लोकसभा चांगलीच चर्चेत आहे. तिकिट वाटपाचा तिढा व संजय जाधवांचा होत असलेला विरोध सर्वत्र ज्ञात आहे. अशा वेळी पक्ष काय निर्णय घेतो या कडे सर्वांचे लक्ष लागले होते. इतकेच नव्हे तर, भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी शिवसेनेकडून उमेदवारीची मागणी केली होती. त्यामुळे आज मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत त्यांची बैठक होऊन त्यावर तोडगा काढण्यात येणार होता. अखेर यावर तोडगा निघाला आहे. मेघना बोर्डीकर यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना यश आल्याचे दिसून येते.

मात्र पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी अपक्ष लढणार अश्या मेघना बोर्डीकर यांच्या निर्धाराचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.