शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित रक्कम वर्ग करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन –  गतवर्षी माहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये झालेल्या क्यार व महा चक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसानीपोटी आपद्ग्रस्तांना मदत निधी तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध झाला. शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई काही प्रमाणात त्याच्या खात्यावर जमा झाली आहे. उर्वरित रक्कम तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश बैकांना देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. क्यार व महाचक्री वादळाचा फटका शेती क्षेत्राला बसला होता. यातून बाहेर पडण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला. परंतू या मदतीची काही रक्कम पाथरी तालुक्यातील शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणे अपेक्षित आहे.

पाथरी तालुक्यात अवेळी पाऊस पडला. याचा फटका शेतकरी वर्गाला बसला. यातून बाहेर पडण्यासाठी सरकारकडे आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली गेली. शेती कामी खर्च करण्यासाठी रक्कम खात्यात जमा व्हावी अशी मागणी केली गेली परंतु बैक प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस कडून गतवर्षीची उर्वरित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी अशी मागणी केली आहे.

झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपीकांच्या आपदग्रसतांना त्यांच्या खात्यात उर्वरित राहिलेली रक्कम तात्काळ जाम होणे कामी प्रशासना कडून बैकांना आदेशीत करण्याची मागणी (10 जुलै ) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष दत्ता मायंळे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे पाथरी तहसील कार्यालयाकडे केली आहे.