शरद पवारांनी बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा ‘राडा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठवाडा विभागात असलेल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीवेळी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या मुख्यालयाबाहेर काहीवेळ तणावाचे वातावरण होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मुख्यालयात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या राड्यामुळे ही बैठक सुरु होण्यास वेळ लागला. बैठकीवेळी परभणी मतदारसंघातील गंगाखेडच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा पराभव नेमका कोणामुळे झाला. यावरून हा वाद सुरु झाला आणि त्याचा शेवट हाणामारीत झाला. कार्य़कर्ते एकमेकांमध्ये भिडल्याचे पाहून या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मराठवाडा विभागात एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यातच बीड जिल्ह्यातील जयदत्त क्षिरसगार यांनी पक्षांतर्गत कलहावर टीका करत शिवसेनेत प्रवेश केला.

अशी असू शकते मराठवाड्याविषयी रणनिती

राष्ट्रवादी काँग्रस आणि काँग्रेसच्या आघाडीला लोकसभेत २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे २०१९ च्या निवडणुकीतही पराभावाचा सामना करावा लागला आहे. २०१४ तुलनेत यंदा काँग्रेसची जास्त नुकसान झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसने बऱ्यापैकी यश मिळवले आहे. मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, परभणी या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला विजय मिळवता आला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला मराठवाड्यामध्ये चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी केल्यास जास्त जागा घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचा असू शकतो.

आरोग्य विषयक वृत्त – 

एक लिंबू ठरते आरोग्यासाठी फायदेशीर

मधमाशी चावल्यावर वेदना कमी होण्यासाठी करा ‘हे’ उपाय

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स