Parbhani News : धक्कादायक ! पतीची आत्महत्या तर पत्नीचा मृत्यू, 10 महिन्यांपुर्वीच झालं होतं लग्न, परभणीमधील घटना

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्णा तालुक्यातील कळगाव येथील एका सुशिक्षीत युवकाने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. लॉकडाऊन काळात मे मध्येच १० महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या होता. गुरूवारी (दि.४) पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. मात्र, पत्नीच्या मृत्यूमागील कारण सायंकाळपर्यंत स्पष्ट होवू शकले नाही. गुरूवारी (दि.४) पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला

दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत ताडकळस पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मोतीराम रामराव देवकते (वय २६) व शामबाला देवकते असे मृत्यू झालेल्या नवदाम्पत्याचे नाव आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, ताडकळसपासून जवळच असलेल्या कळगाव येथे रामराव उमाजी देवकते या सधन शेतकर्‍याची बागायती शेती आहे. त्यांना ४ मुले व १ मुलगी असा परिवार असून त्यापैकी मोतीराम रामराव देवकते (वय २६) याचा मे महिन्यात ताडकळस येथील लक्ष्मण फुगनर यांची मुलगी शामबाला हिच्याशी विवाह झाला होता.

गेल्या १० महिन्यांपासून सुखी संसार सुरू असतानाच गुरूवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हे नवदाम्पत्य खोलीतून बाहेर न आल्याने घरातील व्यक्तींनी दार ठोठावले. परंतू आतमधून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबियांनी अखेर दार तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी मोतीराम देवकते हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. तर त्यांची पत्नी शामबाला ही देखील बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळून आले. त्यांना तातडीने ताडकळस येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी परभणी येथे आणण्यात येत असताना शामबालाचा वाटेतच मृत्यू झाला.

सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत मुळे यांच्यासह धनंजय कनके, गणेश लोंढे, बालाजी शेंडेवाड, सिद्धार्थ डहाळे, पठाण आदींनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. उपविभागीय पोलिस अधिकारी काकडे, सहा.पोलिस निरीक्षक विजय रामोड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देवून घटनेची माहिती घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. बोरीकर, डॉ. कल्पना आळणे यांनी दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केले. मात्र त्याचा अहवाल सायंकाळी उशिरापर्यंत प्राप्त न झाल्याने शामबाला देवकतेच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.