Parbhani News | कर्ज मंजूर आणि वितरणास विलंब ! शेतकर्‍यांचे ‘त्या’ बँकेच्या विरोधात उपोषण

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – Parbhani News | शेतकऱ्यांचे कर्ज प्रस्ताव तहसील प्रशासनाने घेऊन पुढे बँकेकडे पाठवले. याला अनेक महिने लोटले आहेत तरीसुद्धा खरीप पीक कर्ज न मिळाल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी वंचित आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्ज मंजूर करून उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी (4) ऑक्टोबरपासून बँक ऑफ महाराष्ट्रच्या (Bank Of Maharashtra) विरोधात उपोषण करत (Parbhani News) आहेत.

यापूर्वी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली होती. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. याबाबत शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी तहसील कार्यालयासमोर (Parbhani News) उपोषणाला बसले आहेत.

आरोप : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी विष्णू काळे यांनी आरोप केला आहे. पाथरी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेकडून शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या तावडीत ढकलत आहेत. हे चुकीचे आहे. अन्यथा बँकेवर तहसील प्रशासनाने कारवाई करावी शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरीत करण्यास जाणीवपूर्वक विलंब होत आहे. हा प्रकार थांबला पाहिजे.

मागणी : कर्ज मंजूर व वाटपात दिरंगाई थांबवून… त्यांनी बँकेला कर्जाचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याची मागणी केली.

इशारा : कर्ज वितरण आणि मंजूरी विलंब थांबला नाही तर . कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तहसील आणि बँक प्रशासक याला जबाबदार असतील, असा इशारा त्यांनी दिला.

Web Title :- Parbhani News | Loans approved and disbursements delayed! Farmers go on an fast against bank of maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Atul Bhatkhalkar | अमली पदार्थ तस्करीवरून भाजप नेत्याची टीका, म्हणाले – ‘…महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय?’ (व्हिडिओ)

CM Uddhav Thackeray | राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार का? CM उद्धव ठाकरे म्हणाले…

Yugal Suraksha Yojana | एकाच प्रीमियममध्ये पती-पत्नीला मिळेल इन्श्युरन्स कव्हर, कर्जाची सुविधा सुद्धा उपलब्ध; जाणून घ्या