Parbhani News | परभणीचे खासदार संजय जाधव यांना दुसऱ्यांदा जिवे मारण्याची धमकी; राजकीय क्षेत्रात उडाली खळबळ

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – परभणी (Parbhani News) जिल्ह्याचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव (MP Sanjay Jadhav) यांना दुसऱ्यांदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याअगोदर दोन वर्षांपूर्वी नांदेडच्या रींधा टोळीकडून (Reindha Gang) खासदार जाधव यांना जिवे मारण्यासाठी सुपारी घेण्यात आली होती. त्यानंतर आता दुसऱ्यांदा खासदार जाधव यांना जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. (Parbhani News)

कोण आहेत संजय जाधव?
खासदार संजय जाधव हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेमध्ये सक्रिय आहेत. 2004 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. 2009 मध्ये ते विधानसभेत निवडून गेले होते. यानंतर 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर (District Superintendent of Police Ragasudha R) यांना याबाबतीत माहिती दिली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनादेखील याची माहिती देऊन खासदार जाधव यांनी पोलीस संरक्षणाची (Police protection) मागणी केली आहे. (Parbhani News)

संजय जाधव यांच्यापूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना देखील धमकी देण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी (Extortion) न दिल्यास जीवे मारू अशी धमकी देण्यात आली होती. नितीन गडकरी यांना एकदा नाहीतर दोन वेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दोन्ही वेळेस नितीन गडकरी यांना जयेश पुजारी (Jayesh Pujari) या व्यक्तीच्या नावाने धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांत गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.

Web Title :- Parbhani News | parbhani death threat to thackeray group mp sanjay jadhav

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune-Satara National Highway | पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घ्या, अन्यथा…

Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar | कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली श्रीरामपूर व राहाता तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी