Parbhani News | पाथरी न. प. ‘हद्द’वाढीच्या प्रस्तावाला देवनांद्रा ग्रामस्थ व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विरोध?

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – Parbhani News | पाथरी नगर परिषदेच्या (pathri nagar palika) हद्दवाढीच्या प्रस्तावाला तालुक्यातील देवनांद्रा येथील ग्रामस्थ व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवारी विरोध दर्शविला. तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व परभणी जिल्ह्यातील (Parbhani News) देवनांद्रा येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणा देऊन पाथरी नगरपरिषदेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला विरोध करत प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. काँग्रेसचे विश्वनाथ थोरे, बाळासाहेब जाधव, कॉम्रेड दीपक लिपणे यांच्यासह आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी आंदोलकांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन विविध मागण्या करण्यात आल्या. रेणुका शुगर्स कारखाना परिसरातील नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व देवनांद्रा ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे.

विविध प्रकाराच्या करामुळे कारखाना डबघाईस जाण्याची शक्यता….?
रेणुका शुगर्स कारखाना न. प. हद्दीत गेला तर विविध करांच्या ओझ्याखाली जाईल? त्यामुळे तो डबघाईस येऊन साखर कारखाना बंद पडेल. अशी स्थिती निर्माण झाली तर ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडतील. अशी भीती व्यक्त केली जात आहे? असे तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

नियोजित कारखाना बचाव संघर्ष समिती पाथरी च्या वतीने वरील प्रमुख मागणीसह विविध मागण्या दिलेल्या निवेदनाद्वारे केले आहेत. यावेळी तहसील कार्यालय परिसरात पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ थोरे यांचे आवाहन…

आहे त्या ठिकाणीच कारखाना राहावा यातच शेतकऱ्यांचे हित आहे. पाथरी नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावातून कारखान्याचे क्षेत्रफळ वगळण्यात यावे. यासाठी नियोजित कारखाना बचाव संघर्ष समितीने आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ नेते विश्वनाथ थोरे केले.

Web Title :- Parbhani News | Pathri N.P. Devanandra villagers and sugarcane growers oppose proposal to increase boundaries?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी

Beed Suicide | कोल्हापूर येथून बीड जिल्हयात आलेल्या प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा करणार होता ‘या’ अभिनेत्रींचे Live स्ट्रीमिंग; WhatsApp Chat मधून धक्कादायक खुलासे