परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – Parbhani News | परभणीच्या गंगाखेडमधील कस्तुरबा गांधी विद्यालयातील तीन मुलींनी वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपापसातील भांडणातून हा सर्व प्रकार घडल्याची माहिती आहे. यात एकजण गंभीर जखमी, तर एका मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून गृहपालाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. गंगाखेड शहरातील कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयातील आठवीतील विद्यार्थिनींमध्ये वाद झाल्यानंतर तीन विद्यार्थीनींनी वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये पूजा पवार नावाची विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली. तिच्यावर नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर पायल चव्हाण या विद्यार्थिनीच्या पायाला गंभीर इजा झाली. तर उडी मारत असताना प्रीती चव्हाण या मुलीला गेटवरील कर्मचाऱ्याने अलगत पकडले असल्याने ती जखमी झाली नाही.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी ही घटना घडल्यानंतर गंगाखेडचे तहसीलदार यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. दुसरीकडे गंगाखेडचे गटशिक्षण अधिकारी यांनी गृहपाल यांच्याकडून खुलासा मागवला आहे.