परभणी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यालयावर दगडफेक

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  नवा मोंढा पोलिस ठाण्यात बुधवारी मध्यरात्री अज्ञात चार व्यक्ती विरुद्ध दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी, ( 26 ) ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास दोन मोटारसायकलवरील चार अज्ञात लोकांनी वसमत रोड वरील राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केली आणि काच फोडले.

जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात सत्तेच्या संघर्षामुळे हे घडले असावे अशी चर्चा आहे. खासदार संजय जाधव यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की, जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेच्या अशासकीय प्रशासक संचालक मंडळाची नेमणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करूनही राष्ट्रवादीच्या संचालक मंडळाची दुसऱ्यांदा नियुक्ती पुन्हा अन्यायकारक होती. यावरून जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील अंतर्गत वादाचा मुद्दा ऐरणीवर आला. वरील घटनेचा तपास नवा मोंढा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक पल्लेवाड करीत आहेत.