पुण्यातून गावी गेलेल्या तरूणाला साप चावला

पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे पुणे येथून गावी आलेल्या एका तरुणाला सापाने चावा घेतला. ही घटना शनिवारी रात्री च्या सुमारास घडली.

भूषण मोतीराम लहाडे (वय 25) वर्ष हा तरुण घरापासून काहीच हाकेच्या अंतरावर उभ्या असलेल्या एका दुचाकी जवळ थांबला होता.

दुचाकी वर टाकलेले कापड खेचत असताना अचानक पायाला दोन ठिकाणी सापाने चावा घेतला. तात्काळ भूषणला उपचारासाठी बाबुळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परिस्थिती पाहता पुढील उपचारासाठी परभणी येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात भूषण लहाडे वर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

सध्या पुणे शहर हे कोरोनाव्हायरस चे गड समजल्या जाते. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील अनेक जण आपल्या गावाकडे परतत आहेत. लॉकडाऊन झाल्यापासून पुणे येथून अनेक जण परत येत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like