‘या’ मार्गावरील प्रवास लवकरच होणार स्वस्त आणि सुखकर 

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – दक्षिण मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव वार्षीक पाहणी दौऱ्यासाठी बुधवार दि.१२ रोजी औरंगाबदला विशेष रेल्वेने आले होते. रेल्वे स्थानकालगत असलेल्या गॅगमन टूल रुमचे त्यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या गॅगमन कर्मचाऱ्यास रोख पारितोषिक देवून सन्मानीत करुन सर्वाना शुभेच्छा दिल्या. पत्रकारांशी बोलतांना विनोद कुमार यांनी सांगितले की, हा दौरा वार्षीक असून यामध्ये प्रवाशांच्या मागण्या ऐकून त्यांना काय सुविधा देता येतील यावर रेल्वे विभाग भर देत आहे.
नांदेड रेल्वे विभागातील मुदखेड ते परभणी रेल्वे दुहेरीकरणाचे काम पन्नास ते साठ टक्के पूर्ण होत आले आहे. यापूढील काम परभणी ते मनमाड रेल्वे दुहेरीकरण काम सुरु करण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मान्यता लवकरच मिळणार असून येत्या दोन वर्षात रेल्वे दुहेरीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे काही रेल्वे गाडयात वाढ करण्यात येतील असा विश्वास दक्षिण मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी पत्रकारांशी बोलतांना दिला आहे.
अनेक प्रवाशांची मागणी अशी आहे की, रेल्वे ला स्टॉप द्या पण रेल्वे ला स्टॉप दिला तर त्या लांब पल्यांच्या गाडयाचा वेळा विस्कळीत होतात, यासाठी मग इतर रेल्वे स्थानक थांब्यावरील वेळ कमी करावा लागतो तरी जेथे खरच आवश्यक आहे तेथे स्टॉप देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. परभणी ते मनमाड रेल्वेच्या कामासाठी रेल्वे बोर्डाला प्रस्ताव पाठविण्यात येईल. त्याचबरोबर विद्दूतीकरणाचे कामही सुरु करण्यात येईल असे विनोद कुमार यांनी सांगितले. मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडी थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली असल्याने तपोनवन एक्सप्रेसला थांबा देण्याचा विचार करू असे अश्वासन त्यांनी लोकप्रतिनिधी वर्मा यांना दिले. विनोदकुमार यांच्या सह नांदेड विभागातील विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यासाठी म्हणजेच स्टॉप देण्यासाठी किंवा परभणी मनमाड रेल्वे साठी १० कोटी रुपये खर्च करणार असल्याचं हि ते म्हणाले.
मॉडल रेल्वे स्थानक म्हणून घोषना झालेल्या स्थानकांत पुन्हा नव्याने बदल करण्यात येणार आहे. यासाठी परिसरात १० कोटी खर्च करुन मुख्य प्रवेशव्दारापासून मुख्य इमारत पर्यटकांच्या दृष्टिने देखील पाहणी करण्यात येणार आहे. महिन्याभरात पार्किंग पासून प्लॅट फॉर्म चा विकास केला जाणार आहे. तसेच स्थानक क्रमांक चार वर पर्यटकांना घेवून येणारी डेक्कन ओडीसी थांबते तेथे सुविधा नसून या स्थानकाचा विकास करुन इंटरनॅशनल स्थानक करण्यात येणार आहे. यासाठी एक कोटी खर्च करण्यात येणार आहे. असा आलेख त्यांनी तिथे मांडला.