परभणी : कायमस्वरूपी लॉक डाऊन रद्द करण्याची परभणी येथील वंचित कार्यकर्त्यांची मागणी

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने वेळोवेळी लॉकडाऊन चा पर्याय अवलंब केला आहे. सरकारच्या या भूमिकेचा सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला असे दिसते. वंचित बहुजन आघाडी ने सरकारच्‍या भूमिकेबाबत आपले मत व्यक्त केले आहे. सरकारने लॉकडाऊन आणल्यानंतर आम्ही मोडू असा इशाराही वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

लॉक डाऊन मुळे सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याचा परिणाम सर्वसामान्य जनता, छोट्या व्यापाऱ्यांवर. आणि अर्थकारणावर होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी लॉक डाऊन मोडण्याचा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभुमिवर स्थानिक कार्यकर्त्यांकडून प्रशासनाला निवेदन दिले जात आहे. पाथरी येथील वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (03)ऑगस्ट रोजी प्रशासनाला निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सरकारने लोक डाऊन अनन्या ऐवजी इतर पर्याय निवडले पाहिजे. कायमस्वरूपी लॉक डाउन रद्द करून इतर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. अन्यथा पुढील आंदोलनाची रूपरेषा पक्षाकडून ठरवण्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला.

पाथरीचे प्रभारी तहसीलदार बीएस कट्टे यांना देण्यात आलेल्या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. अशोक पोटभरे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सह सचिव कैलास पवार, वंचित बहुजन आघाडीचे पाथरी तालुका अध्यक्ष खुर्शीद शेख यांच्यासह इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like