Advt.

सोशल मीडियावर गाजलेले ‘संजय राऊत’ परभणीचे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत खूपच चर्चेत राहिले. अशात राजकीय घडामोडींमध्येच परभणीतील दुसरे संजय राऊत सोशलवर गाजताना दिसले. परभणीमधील ही व्यक्ती अगदी संजय राऊतांप्रमाणे दिसत असल्यानं त्यांची खूप चर्चा झाली. लक्ष्मण भदरगे असं या परभणीच्या संजय राऊतांचं नाव आहे. भदरगे जिल्हा पोलीस दलात नोकरी करतात. परभणी जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत ते कार्यरत आहे. मध्यंतरी त्यांचा लग्न सोहळ्यातील डान्सचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसला. राजकीय घडामोडी सुरू असातनाच सोशलवर त्यांची चर्चा पहायला मिळाली.

परभणीमधील सेलू येथे केला व्हिडीओ
परभणीतील सेलू शहरात एक लग्न समारंभ होता. भदरगे यांनी एका गाण्यावर नृत्य केलं होतं. रविराज नावाच्या मुलानं त्यांचा व्हिडीओ शुट केला आणि टिकटॉकवर टाकला. काही दिवसांतच हा व्हिडीओ व्हायरल झाला. अवघ्या 4 दिवसांतच या व्हिडीओनं 21 लाख व्ह्युज मिळवले. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला. 20 सेकंदाच्या या व्हिडीओनं लक्ष्मण भदरगे यांना संजय राऊत करून टाकलं. अनेकांनी त्यांची तुलना संजय राऊतांशी केली. त्यांच्या आणि संजय राऊतांच्या चेहऱ्यात बरंच साम्यही दिसत आहे.

सेल्फीसाठी भदरगेंपाशी गर्दी
सध्या जिल्हा सामान्य रुग्णलयात ड्युटीवर असणाऱ्या भदरगेंकडे अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सेल्फी घ्यायला गर्दी करतात. अगदी तरुण असो वा लहान त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी अनेकजण पुढे येतात. त्यांना भेटणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही.

‘ही माझ्यासाठी अभिमानाची बाब’
दरम्यान लक्ष्मण भदरगे या सगळ्यावर बोलताना प्रतिक्रिया देत म्हणतात, “खासदार संजय राऊत हे खूप मोठे नेते आहेत. त्यांची मी बरोबरी करू शकत नाही. केवळ योगायोगानं या व्हिडीओत त्यांचा व माझा चेहऱ्यात साम्य दिसत आहे असे लोक म्हणतात. एवढ्या मोठ्या नेत्यासोबत माझं नाव जोडलं जात आहे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.” असं ते सांगतात.

Visit : policenama.com