Parenting | चुकूनही मुलांना बोलू नका ‘या’ 5 गोष्टी, भारतीय पालक करतात ‘या’ चूका ज्या पडतात महागात; जाणून घ्या

नवी दिल्ली : Parenting | प्रत्येक पालकांना वाटते की त्यांच्या मुलांनी कोणतेही चुकीचे काम करू नये. जेव्हा मुले असे काम करतात तेव्हा पालक आपल्या पद्धतीने त्यांच्यावर राग काढतात. कधी-कधी रागात येऊन बोललेल्या काही गोष्टी मुलांचे मन दुखावतात. विचार न करता बोललेल्या पालकांच्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या मानावर होतो. तज्ज्ञ सांगतात की, काही गोष्टी (Parenting) मुलांसोबत अजिबात बोलू नये.

1. ’तू जन्मालाच आला नसता तर बरं झालं असतं’ : –

तुम्ही कितीही नाराज झालात किंवा संतापलात तरी मुलांना चुकूनही बोलू नका की, ’तू जन्मालाच आला नसता तर बरं झालं असतं’. कोणत्याही मुलाला आपल्या पालकांकडून हे ऐकायचे नसते. असे बोलण्याने मुलांच्या भावना दुखावतात, शिवाय त्यांचा आत्मसन्मान सुद्धा दुखावतो. यामुळे मुलाच्या मनात ही शंका येऊ शकते की, तो कुणालाच आवडत नाही.

2. ’लवकर आटप, नाहीतर मी तुला इथंच सोडून जाईन’ –

कुठे जायचे असेल आणि तुम्हाला उशीर होत असेल तर मुलाला कधीही असे म्हणू नका की लवकर आटप नाहीतर मी तुला इथंच सोडून निघून जाईन. मुलांना वेळेच्या किंमतीचा अंदाज मोठ्यांप्रमाणे नसतो. अशा बोलण्याने त्यांच्या मनात हरवण्याची किंवा सोडून जाण्याची भीती निर्माण होते. उशीर होत असेल तर लवकर आटपण्यासाठी वेगळ्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता.

3. ’तुला जे आम्ही सांगतो ते कधीही करत नाहीस’ –

जर तुम्ही मुलाला वारंवार असे बोललात तर त्याच्या मनात ही भावना येईल की, तो काहीही योग्यप्रकारे करत नाही. त्याऐवजी असे म्हणा की, मला वाटतं की तू हे काम यापद्धतीने कर. तुम्हाला जे हवे आहे ते मुलाला स्पष्टपणे सांगा आणि चुकीचे असले तरी प्रेमाने सांगा की, ते कशाप्रकारे करायचे होते.

4. ’तू तुझ्या भाऊ/बहिणीसारखा असतास तर’ –

दुसर्‍यांसोबत तुलना कुणालाही पसंत नसते. मुलांना आपले केलेले कौतूक जास्त पसंत असते. अशाप्रकारचे बोलणे मुलाच्या मनात आपला भाऊ/बहिणीसाठी द्वेषाची, स्पर्धेची भावना वाढवते. मुलांच्या सुद्धा मनात ही गोष्ट घर करते की, तो आपला भाऊ/बहिणीसारखा चांगला कधीही होऊ शकत नाही. लक्षात ठेवा की प्रत्येक मुल वेगळे असते आणि त्याचे आपले वैशिष्ट्य असते.

5. ’आपण ते खरेदी करू शकत नाही’-

जर तुम्ही तुमच्या मुलाला हे म्हणालात की, ही वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही तर त्याला वाटेल की, पैशाने प्रत्येक आनंद खरेदी करता येऊ शकतो. त्याच्या मनात ही गोष्ट येईल की, तुम्ही एखाद्या आर्थिक तंगीमध्ये आहात, जरी तुम्ही नसाल.
मुलाला नकार देण्याचे एखादे वेगळे पण योग्य कारण सांगा.

जर नकळत तुम्ही मुलाला असे काही बोललात तर ताबडतोब त्यास सॉरी बोला आणि समजवा की, तुमच्या बोलण्याचा हा अर्थ नव्हता.
तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता आणि यापुढे तुम्ही असे बोलणार नाही.
मुले पालकांकडून अपेक्षा करतात की, ते प्रत्येक कामात त्यांचे धैर्य वाढवतील.

हे देखील वाचा

Kolhapur Crime | शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला 4 वर्षाची शिक्षा,10 हजारांचा दंड

Pune Crime | बेपत्ता तरुण बिल्डरचा विहिरीत आढळला मृतदेह, खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप; परिसरात प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Parenting | kids parenting family children behaviour indian parents negative comments

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update